Awesome Mora Mahiya:'कॅलेंडर गर्ल्स'चं पहिलं गाणं रिलीज

इंडस्ट्रीमध्ये फॅशन, ग्लॅमर आणि यामागचं सत्य अनेकदा चित्रपटांद्वारे दाखवण्यात येतं. त्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मधुर भंडारकरचा आगामी चित्रपट 'कॅलेंडर गर्ल्स'चं पहिलं गाणं रिलीज झालंय.

Updated: Aug 26, 2015, 04:08 PM IST
Awesome Mora Mahiya:'कॅलेंडर गर्ल्स'चं पहिलं गाणं रिलीज title=

मुंबई: इंडस्ट्रीमध्ये फॅशन, ग्लॅमर आणि यामागचं सत्य अनेकदा चित्रपटांद्वारे दाखवण्यात येतं. त्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मधुर भंडारकरचा आगामी चित्रपट 'कॅलेंडर गर्ल्स'चं पहिलं गाणं रिलीज झालंय.

आणखी वाचा - VIDEO TRAILER : भेटा मधुरच्या 'कॅलेंडर गर्ल्स'ना!

'ऑसम मोरा माहिया' नावाच्या गाण्यात पाच सुंदर मॉडेल्स बोल्ड आणि ग्लॅमरस शूट करतांना दिसत आहेत. या गाण्याला चित्रपटाचं पार्टी साँग म्हणता येईल. या गाण्यात मॉडेल आकांश पुरी, अवानी मोदी, कियारा दत्त, रूही सिंह आणि सतरुपा पाइन आहे. 

आणखी वाचा - व्हिडिओ : मधुरच्या 'कॅलेंडर गर्ल्स'चा टीजर प्रदर्शित

सुंदर लोकेशन्सवर गाण्याचं शूट केलं गेलंय. यात बीचपासून क्रूज आणि जंगलापर्यंत सर्वांचा वापर केलाय. हे गाणं गायलंय मीत ब्रदर्स अंजन आणि खुशबू ग्रेवाल यांनी. संगीतही त्यांचंच आहे. हा चित्रपट 25 सप्टेंबरला रिलीज होणार आहे.

पाहा व्हिडिओ -

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.