अरेरे....! बेबी डॉल तर निघाली कॉपी डॉल...

रागिणी एमएमएस-2 या ग्लॅमरस चित्रपटाचं अती ग्लॅमरस गाणं बेबी डॉल निघालं चोरलेलं.... हो हे गाणे मूळ नसून ते एका पाकिस्तानी लोक संगीतातून चोरलेलं आहे. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो....

Updated: Nov 25, 2014, 07:09 PM IST
अरेरे....! बेबी डॉल तर निघाली कॉपी डॉल... title=

मुंबई : रागिणी एमएमएस-2 या ग्लॅमरस चित्रपटाचं अती ग्लॅमरस गाणं बेबी डॉल निघालं चोरलेलं.... हो हे गाणे मूळ नसून ते एका पाकिस्तानी लोक संगीतातून चोरलेलं आहे. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो....

 

सनी लिऑननं या गाण्याला जणू चार चाँद लावले असंच म्हणावं लागेल. ही हॉट बेबी डॉल थोड्याच वेळात तळागाळात जाऊन पोहचली. 

सगळ्यांच्याच आवडीचं हे गाणं कॉपी केलं गेलंय पाकिस्तानातून. एका पाकिस्तानी बलुची गायकांनी हे गाणं गायलं आहे. त्याचाच व्हिडिओ आमच्या हाती लागला आहे.

 

बॉलीवूडच्या गाण्यांना कशी आणि कोठून स्फुर्ती मिळेल हे काही सांगू शकत नाही याचेच हे उत्तम उदाहरण.

हे गाणे कनिका कपूर हिने गायलं आहे तर मीत ब्रदर्स अंजान यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. पण मीत ब्रदर्सची ओरिजनल कलाकृती नसल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.