अवघ्या ४८ तासांत ६.५ कोटी लोकांनी पाहिला 'बाहुबली२' चा ट्रेलर

Last Updated: Monday, March 20, 2017 - 17:49
अवघ्या ४८ तासांत ६.५ कोटी लोकांनी पाहिला 'बाहुबली२' चा ट्रेलर

मुंबई : 'बाहुबली : द कनक्लूजन' या सिनेमाचा ट्रेलर १६ मार्चला रिलीज झाला आणि अवघ्या ४८ तासांत तब्बल ६.५ कोटी लोकांनी हा ट्रेलर पाहिला. भारतीय सिनेसृष्टीत इतर सिनेमांच्या तुलनेत या सिनेमाच्या ट्रेलरचे व्ह्यूज सर्वाधिक असल्याचे करणने म्हटलेय. 

दोन मिनिटे २० सेकंदाचा हा ट्रेलर आहे. हिंदी, तेलुगु, तामिळ आणि मल्याळम या चारही भाषांमध्ये हा ट्रेलर लाँच करण्यात आला होता. 

२०१५मध्ये बाहुबली हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर या सिनेमाने अनेक रेकॉर्ड मोडीत काढले होते. या सिनेमा संपल्यावर मात्र साऱ्यांना एकच प्रश्न पडला होता तो म्हणजे कटप्पाने बाहुबलीला का मारले? 

या प्रश्नाचे उत्तर मिळावण्यासाठी चाहते बाहुबलीच्या या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा करत होते. अखेर या सिनेमाचा ट्रेलर १६ मार्चला लाँच करण्यात आला. हा सिनेमा २८ एप्रिलला रिलीज होणार आहे. सिनेमात प्रभास, राणा दग्गुबत्ती, अनुष्का शेट्टी, तमन्ना, रमय्या कृष्णन, सत्यराज आणि नासर आहेत. 

 

First Published: Monday, March 20, 2017 - 17:43
comments powered by Disqus