बाजीराव - मस्तानी : पाहा, आगळ्या-वेगळ्या प्रेमकहाणीचा ट्रेलर

संजय लीला भन्साळी यांचा बहुप्रतिक्षित अशा 'बाजीराव मस्तानी' या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय. 

Updated: Jul 16, 2015, 12:26 PM IST
बाजीराव - मस्तानी : पाहा, आगळ्या-वेगळ्या प्रेमकहाणीचा ट्रेलर  title=

मुंबई : 'लार्जर दॅन लाईफ' सिनेमा बनवावा तर संजय लीला भन्साळीनंच असं म्हटलं तर वावगं ठरायला नको... कारण, हाच अनुभव 'बाजीराव मस्तानी' या सिनेमाच्या केवळ २ मिनिटांच्या ट्रेलरमध्ये येतोय.

बहुप्रतिक्षित अशा 'बाजीराव मस्तानी' या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. रणवीर सिंग या सिनेमात 'बाजीराव'च्या भूमिकेत दिसतोय. 'मस्तानी'च्या भूमिकेत दीपिका पादूकोण तर काशीबाईच्या भूमिकेत प्रियांका चोप्रा दिसणार आहे... 

 

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.