पाकिस्तानात 'बजरंगी भाईजान'वर उड्यावर दुड्या

'बजरंगी भाईजान'ने पाकिस्तानी प्रेक्षकांना वेड लावले आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या दुसऱ्या आठवड्यातही चित्रपट पाहण्यासाठी लोकांनी हाऊसफूल गर्दी केली आहे. चित्रपटात भारत-पाक यांच्यातील संबंधात सकारात्मक संदेश दिल्यामुळे सलमान खानच्या या चित्रपटाला जबरदस्त पसंती मिळाली आहे. 

Updated: Jul 29, 2015, 08:10 PM IST
पाकिस्तानात 'बजरंगी भाईजान'वर उड्यावर दुड्या title=

लाहोर : 'बजरंगी भाईजान'ने पाकिस्तानी प्रेक्षकांना वेड लावले आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या दुसऱ्या आठवड्यातही चित्रपट पाहण्यासाठी लोकांनी हाऊसफूल गर्दी केली आहे. चित्रपटात भारत-पाक यांच्यातील संबंधात सकारात्मक संदेश दिल्यामुळे सलमान खानच्या या चित्रपटाला जबरदस्त पसंती मिळाली आहे. 

चित्रपटगृह मालकांनी दिलेल्या माहितीनुसार चित्रपट पाहिल्यावर मोठ्या संख्येत नागरिकांच्या डोळ्याच्या कडा पाणावलेल्या होत्या. चित्रपट संपल्यावर हे चित्र दिसत होते, असा दावा चित्रपटगृह मालकांनी केला आहे. 

या चित्रपटात बजरंग बलीचा भक्त पवनकुमार चतुर्वेदी (सलमान) एका मुक्या पाकिस्तानी मुलीला तिच्या गावात सुरक्षित पोहचवतो अशी या चित्रपटाची काहणी आहे. 

लाहोरमधील सिने स्टार सिनेमाचे शहराम रजा यांनी सांगितले की, गेल्या सात वर्षांपासून या व्यवसायात आहे, पण इतक्या मोठ्या प्रमाणात डोळ्यात अश्रू घेऊन सिनेमा हॉलच्या बाहेर पडणारे प्रक्षेक पहिल्यांदा पाहतो आहे. तिकीट खरेदी करताना लोकांमध्ये खूप उत्साह जाणवतो आहे. 

पाकिस्तानात काही तरूणांनी हा चित्रपट दोनवेळा पाहिला आहे. यातील एक प्रेक्षक मोमिना राणा म्हणाल्या, ही पहिली भारतीय फिल्म आहे की, ज्यात पाकिस्तानचे सकारात्मक रूप दाखविले आहे. भारतीय चित्रपट निर्मात्यांच्या विचारात झालेला सकारात्मक बदल पाहून खूप आनंद होत आहे. 

भारत आणि पाकिस्तानातील जनता शांतता प्रिय आहेत. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानात या चित्रपटाला अधिक पसंती मिळत आहे.  मी हा चित्रपट अनेक वेळा पाहिला तरी समाधान होणार नाही. कारण असे चित्रपट रोज बनत नाहीत. 

पाकिस्तान चित्रपट वितरक संघाचे अध्यक्ष जोराएज लशारीने सांगितले की, बजरंगीमुळे ईदच्या सुट्ट्या खूप चांगल्या गेल्या.  देशातील ८० पेक्षा अधिका सिनेमाघरात हा चित्रपट हाऊसफूल होता. याचे तिकीट मिळविण्यासठी लोक रांगेत उभे होते. चित्रपटाने पाकिस्तानात चांगला बिझनेस केला आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.