व्हिडिओ : बाईकस्वार तरुणांच्या अंगावर सलमान गेला धावून...

नुकताच अभिनेता सलमान खानचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये आपल्या गाडीचा पाठलाग करणाऱ्या युवकांना धडा शिकवण्यासाठी सलमान तावातावाणं गाडीखाली उतरलेला दिसतोय. 

Updated: Jan 28, 2015, 04:37 PM IST
व्हिडिओ : बाईकस्वार तरुणांच्या अंगावर सलमान गेला धावून... title=

मुंबई : नुकताच अभिनेता सलमान खानचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये आपल्या गाडीचा पाठलाग करणाऱ्या युवकांना धडा शिकवण्यासाठी सलमान तावातावाणं गाडीखाली उतरलेला दिसतोय. 

हा प्रसंग ओढावला राजस्थानच्या झुंझुनूमध्ये... काही दिवसांपूर्वी सलमान खानचा आगामी चित्रपट 'बजरंगी भाईजान'ची शूटींग इथं सुरू होती... यावेळी, आजुबाजूच्या लोकांना इथं सलमान खान आलाय हे कळल्यानंतर त्याला पाहण्यासाठी इथं एकच गर्दी जमली. 

सलमाननं आपली पांढरी मर्सिडीज सुरू करताच काही बाईकस्वार तरुणांनी सलमानच्या गाडीचा पाठलाग सुरू केला. एक तरुणाची बाईक तर सलमानच्या गाडीवर धडकता धडकता वाचली... हे पाहून सलमानचा पारा चढला. 

मग काय, सल्लू भायनं भररस्त्यात आपली गाडी थांबवण्याचं फर्मान सोडलं आणि तो आपल्या मर्सिडीजमधून खाली उतरला. सलमानचा हा अवतार पाहून बाईक स्वार तरुण थोडे भांबावले आणि त्यांनी तिथून धूम ठोकली... यावेळी त्यांनी काही अपशब्दांचाही वापर केला.  

यानंतर मात्र सलमाननं स्वत:चा राग आवरता घेतला आणि नंतर तो आपल्या गाडीत बसून शूटींगसाठी रवाना झाला. 

व्हिडिओ पाहा :-

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.