अभिनेत्री गीता बासरा-भज्जी लवकरच अडकणार विवाहबंधनात

नुकताच म्हणजे २ जुलैला हरभजन सिंहनं आपला ३५वा वाढदिवस साजरा केला. आपल्या बर्थडे पार्टीमध्ये भज्जीनं वरातीत भांगडा करायला तयार राहा, असं म्हणत लवकरच आपण विवाहबंधनात अडकणार असल्याचे संकेत दिले. अभिनेत्री गीता बासरासोबत भज्जीचे प्रेमसंबंध आहेत.

Updated: Jul 5, 2015, 08:16 PM IST
अभिनेत्री गीता बासरा-भज्जी लवकरच अडकणार विवाहबंधनात title=

मुंबई: नुकताच म्हणजे २ जुलैला हरभजन सिंहनं आपला ३५वा वाढदिवस साजरा केला. आपल्या बर्थडे पार्टीमध्ये भज्जीनं वरातीत भांगडा करायला तयार राहा, असं म्हणत लवकरच आपण विवाहबंधनात अडकणार असल्याचे संकेत दिले. अभिनेत्री गीता बासरासोबत भज्जीचे प्रेमसंबंध आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जालंधरच्या छोट्या बारादरी भागात आपली आई आणि मित्रांसोबत भज्जीनं वाढदिवस साजरा केला. विशेष म्हणजे भज्जीच्या वाढदिवशीच त्याची गर्लफ्रेंड गीताचा चित्रपट 'सेकंड हॅण्ड हस्बँड' रिलीज झालाय. यात हरभजन सुद्धा गेस्ट रोलमध्ये आहे. 

नात्यावर शिक्कामोर्तब

चित्रपटात हरभजन अशा तरुणाच्या भूमिकेत आहे ज्याचं लग्न गीता बासरा सोबत होतं. सूत्रांनुसार या दोघांचं नातं खाजगीतून सार्वजनिक होण्यासाठीच ही भूमिका भज्जीला देण्यात आलीय.  

 

गीतानं अजून सार्वजनिक ठिकाणी आपलं नातं स्वीकारलं नसलं तरी भज्जीचे सर्व मित्र तिला भाभीजी म्हणूनच हाक मारतात. भज्जीनं वाढदिवशी मित्रांना जे म्हटलं त्यानुसार आता लवकरच तो बोहल्यावर चढणार हे दिसतंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.