कपिल शर्माच्या नव्या शोबाबत बोलली भारती सिंह

कपिल शर्मा आणि कलर्स चॅनेलमध्ये वाद झाल्यामुळे कपिल शर्माने कॉमेडी नाईट्स विथ कपिल हा शो करणं बंद केलं. त्यानंतर कलर्सने कॉमेडी नाईट लाईव्ह या नावाने शो सुरू ठेवत कृष्णा अभिषेक याच्या हातात शोची सूत्र दिली.

Updated: Feb 25, 2016, 10:40 PM IST
कपिल शर्माच्या नव्या शोबाबत बोलली भारती सिंह title=

मुंबई : कपिल शर्मा आणि कलर्स चॅनेलमध्ये वाद झाल्यामुळे कपिल शर्माने कॉमेडी नाईट्स विथ कपिल हा शो करणं बंद केलं. त्यानंतर कलर्सने कॉमेडी नाईट लाईव्ह या नावाने शो सुरू ठेवत कृष्णा अभिषेक याच्या हातात शोची सूत्र दिली.

कृष्णा सोबत भारती ही देखील कॉमेडी नाईट लाईव्हमध्ये काम करते. कपिल शर्माने हा त्याचा शो सोनी या चॅनेलवर सुरू करणार आहे. त्यावर भारती सिंह हिने प्रतिक्रिया दिली असल्याचं एका वेबसाईटने म्हटलं आहे.

भारती सिंहने म्हटलं की, 'प्रत्येक जण प्रश्न करतोय की कपिल पुन्हा येतोय, तर येतोय तर येतोय . बिग डील!  जेव्हा कॉमेडी नाईट्स लाईव्ह घेऊन आलो तेव्हा ही अशाच हालचाली झाल्या होत्या, बरोबर ?'

भारती म्हणते की, कपिल आणि मी भाऊ-बहिणी प्रमाणे आहोत. कृष्णा आणि कपिलमध्ये स्पर्धा आहे. स्पर्धा आहे तेव्हा तर मजा आहे. मी कपिलसाठी खूप खूश आहे.'