पाहा ही शांताबाई! भाऊ कदमची धमाल!

झी मराठी अॅवॉर्ड्सच्या नॉमिनेशन पार्टीत विनोदवीर भाऊ कदम यांनी धम्माल उडवून दिली. या संपूर्ण सोहळ्यात भाऊ सध्या प्रसिद्ध झालेल्या 'शांताबाई'च्या रुपात दिसला. या शांताबाईनं उपस्थितांचं मनोरंजन तर केलंच, शिवाय सोहळ्याला येणाऱ्या प्रत्येकाचं आपल्या हातांनी स्वागत केलं. 

Updated: Oct 14, 2015, 10:32 AM IST
पाहा ही शांताबाई! भाऊ कदमची धमाल! title=

मुंबई:  झी मराठी अॅवॉर्ड्सच्या नॉमिनेशन पार्टीत विनोदवीर भाऊ कदम यांनी धम्माल उडवून दिली. या संपूर्ण सोहळ्यात भाऊ सध्या प्रसिद्ध झालेल्या 'शांताबाई'च्या रुपात दिसला. या शांताबाईनं उपस्थितांचं मनोरंजन तर केलंच, शिवाय सोहळ्याला येणाऱ्या प्रत्येकाचं आपल्या हातांनी स्वागत केलं. 

'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय कार्यक्रमात आपण भाऊची ही धमाल येत्या २६ आणि २७ ऑक्टोबरला पाहू शकणार आहोत. 

कलाकारांच्या उपस्थितीत रंगला आनंद सोहळा 

झी मराठी अॅवॉर्डच्या आधी रंगणारा आनंद सोहळा यावर्षीही एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये मोठ्या थाटात पार पडला. ‘मनोरंजनाची जत्रा’ अशी संकल्पना असलेल्या या आनंद सोहळ्यात सर्व कलाकारांनी रंगबिरेंगी पोषाखात हजेरी लावली होती. यात प्रत्येक मालिकेच्या विषयावर आधारित काही मजेदार खेळांचे स्टॉल्सही उभारण्यात आले होते. यावेळी ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाच्या दोन विशेष भागांचंही चित्रीकरण करण्यात आलं. येत्या २६ आणि २७ ऑक्टोबरला रात्री ९.३० वाजता हे भाग प्रसारित होणार आहेत. 

१ नोव्हेंबरला पाहा पुरस्कार वितरण सोहळा

यावर्षी सर्वोत्कृष्ट मालिकेसाठी ‘जय मल्हार’, ‘नांदा सौख्य भरे’, ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘का रे दुरावा’ आणि ‘दिल दोस्ती दुनियादारी’ यांच्यात चुरस रंगणार असून सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रमासाठीची स्पर्धा ‘होम मिनिस्टर’, ‘आम्ही सारे खवय्ये’ आणि ‘चला हवा येऊ द्या’मध्ये रंगणार आहे. 

सर्वोत्कृष्ट नायकाच्या मानासाठी खंडोबा, नील जहागिरदार, श्रीरंग गोखले, जयराम खानोलकर यांना नामांकने मिळाले असून म्हाळसा, बानू, स्वानंदी, जान्हवी, अदिती आणि अस्मिता यांच्यामधून सर्वोत्कृष्ट नायिकेची निवड होणार आहे. याशिवाय इतर महत्त्वांच्या विभागांमध्ये अनेक लोकप्रिय व्यक्तिरेखांचा समावेश आहे. 

कैवल्य आणि आशू करणार सोहळ्याचं अँकरिंग

यावर्षीच्या रंगतदार सोहळ्याचं निवेदन ‘दिल दोस्ती दुनियादारी’मधील कैवल्य आणि आशुतोष ही जोडगोळी करणार असून आपल्या खुमासदार शैलीनं या सोहळ्यात ते हास्याचे आणि मैत्रीचे विविध रंग भरणार आहेत. येत्या १ नोव्हेंबरला हा सोहळा झी मराठीवरून प्रसारित होणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.