क्रिकेटर भुवनेश्वर कुमार आहे श्रद्धाचा चाहता

अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या चाहत्यांची संख्या काही कमी नाहीये. भारतीय क्रिकेट संघातही असे खेळाडू आहेत, ज्यांची श्रद्धा फॅन आहे.

Updated: Apr 23, 2017, 04:33 PM IST
क्रिकेटर भुवनेश्वर कुमार आहे श्रद्धाचा चाहता title=

मुंबई : अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या चाहत्यांची संख्या काही कमी नाहीये. भारतीय क्रिकेट संघातही असे खेळाडू आहेत, ज्यांची श्रद्धा फॅन आहे.

श्रद्धाचा हा नवा फॅन म्हणजे भारतीय खेळाडू आणि आयपीएलमध्ये सध्या आपल्या गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधणारा हैदराबाद संघाचा स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमार. तो फक्त फॅनच नाहीये तर श्रद्धाला घेऊन भुवनेश्वरला निर्मनुष्य बेटावर जायचंय.

स्टार स्पोर्ट्स एका व्हिडीओमध्ये भुवीला एक प्रश्न विचारण्यात आला. समजा तुला निर्मनुष्य बेटावर तीन जणांसोबत जायचेय. तर त्या तीन व्यक्ती कोण असतील. त्याने रवी शास्त्री, महेंद्रसिंग धोनी आणि श्रद्धा कपूर असे उत्तर दिले. श्रद्धाचे नाव घेतल्यानंतर तेथील उपस्थितांच्याही भुवया उंचावल्या.