बिग बी-अक्षय पुन्हा १२ वर्षांनी एका स्क्रीनवर

आर बाल्की बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय बरोबर पॅडमॅन या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच काम करत आहेत. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 20, 2017, 02:28 PM IST
बिग बी-अक्षय पुन्हा १२ वर्षांनी एका स्क्रीनवर

मुंबई : आर बाल्की बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय बरोबर पॅडमॅन या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच काम करत आहेत. आर बाल्कींच्या प्रत्येक सिनेमात आतापर्यंत बिग बी प्रमुख भूमिकेत होते..त्यामुळे पॅडमॅन या सिनेमातही बिग बी असतील असा अंदाज वर्तविला जात होता.

आता अमिताभ बच्चनंच या बातमीला दुजोरा दिला आहे..बिग बींनी व्टिट करुन पॅडमॅनमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत असल्याचं स्पष्ट केलं आहे..या सिनेमाच्या निमित्ताने बिग बी आणि अक्षय पुन्हा एकदा तब्बल १२ वर्षांनी स्क्रिन शेअर करणार आहेत.