बिग बॉसची ऑफर कुमार विश्वासनं का नाकारली?

Updated: Sep 3, 2014, 09:13 PM IST
बिग बॉसची ऑफर कुमार विश्वासनं का नाकारली?

नवी दिल्लीः कलर्स या वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या रिअॅलिटी शो बिग बॉस सिझन आठमध्ये कवी आणि आम आदमी पक्षाचे नेते कुमार विश्वास दिसणार नाहीय. कुमार विश्वास या शोमध्ये असतील अशी चर्चा होती. मात्र कुमार विश्वासानं या शोमध्ये येण्यासाठी काही अटी ठेवल्या होत्या या अटींना कलर्स टि.व्हीनं अमान्य केलंय.

शहिदांच्या विधवांना 21 कोटी रुपये दान करा, अशी अट कुमार विश्वासांनी बिग बॉस कंपनीसमोर ठेवली होती. मात्र कुमार विश्वासांच्या मते त्यांना या शोसाठी जे मानधन मिळणार आहे. त्या रकमेला धरुन एकूण 21 कोटी रुपये होतात.

तसंच बिग बॉसच्या निर्मात्यांनी शहिद विधवा कल्याण कोष (वॉर विडोज फंड) यांना ही रक्कम दान करावी, असं मत कुमार विश्वासांनी बिग बॉसच्या निर्मात्या समोर स्पष्ट केलं आहे. तरंच या शोमध्ये मी येईल. मात्र कुमार विश्वासांना या शोसाठी किती रक्कम मिळणार ही माहिती त्यांनी दिली नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.