बीग बॉस : 'कॅप्टन' सलमान आणि आपत्कालीन दरवाजा!

मुंबई : बिग बॉसचं आठवं पर्व पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचलीय.

Updated: Sep 11, 2014, 02:41 PM IST
बीग बॉस : 'कॅप्टन' सलमान आणि आपत्कालीन दरवाजा! title=

मुंबई : बिग बॉसचं आठवं पर्व पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचलीय. ही उत्सुकता तर आता आणखीनच ताणलीय ती 'कॅप्टन' सलमाननं आणि बिग बॉसच्या विमानाच्या आपात्कालीन दरवाजानं... 

यंदाच्याही पर्वात सल्लूमियाँ हा कार्यक्रम होस्ट करताना पाहायला मिळणार हे एव्हाना स्पष्ट झालंय. छोट्या पडद्यावरील भरपूर मसाला आणि अॅक्शन असलेला हा रिअलिटी शो गेल्या अनेक पर्वात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचं 

दिसलंय. त्यात आणखीन भर पडली ती सलमान खानच्या मिश्कील स्टाईलची... यंदाच्या पर्वात बिस बॉसच्या विमानाचा 'कॅप्टन' बनून सलमान प्रेक्षकांसमोर येतोय.   

बॉलिवूडचा दबंग खान या कार्यक्रमाच्या पाचव्या पर्वापासून सलग या  कार्यक्रमाचं होस्टिंग करताना दिसतोय. म्हणजेच, या सलग चौथ्यांदा तो या  कार्यक्रमाचं होस्टिंग करणार आहे... आता या पर्वात काही नवे प्रयोग करताना 

सलमान चक्क कॅप्टन बनून बिग बॉसचं विमान उडवताना आपल्याला दिसणार आहे.  

बिग बॉसच्या विमानाचा हा दरवाजा फक्त आपात्कालीन परिस्थतीमध्येच उघडला जाईल, असं कॅप्टन सलमान सांगताना प्रोमोमध्ये दिसतोय. 'ये सफर होगा मस्त... ट्विस्ट होंगे जबरदस्त, कान्ट वेट कान्ट वेट बिग बॉस सिझन 

8' म्हणणारा हा प्रोमो पाहून सलमानच्या फॅन्सची उत्सुकता नक्कीच ताणली गेलीय... 21 सप्टेंबरला सलमानसहीत बिग बॉसचं हे विमान टेक ऑफ घेणार आहे... तुम्ही तयार आहात ना?

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.