माहित आहे का, ऐश्वर्याच्या 'जज्बा'ने पहिल्याच आठवड्यात किती कोटी केली कमाई?

आई झालेल्या ऐश्वर्या राय-बच्चनने बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा झोकात एंट्री केलेय. 'जज्बा' या सिनेमातून कमबॅक केलेल्या अॅशने दमदार भूमिका साकरलेय. तिच्या या सिनेमाने पहिल्याच आठवड्यात १५.१४ कोटींची घसघशीत कमाई केलेय.

Updated: Oct 13, 2015, 11:18 AM IST
माहित आहे का, ऐश्वर्याच्या 'जज्बा'ने पहिल्याच आठवड्यात किती कोटी केली कमाई? title=

मुंबई : आई झालेल्या ऐश्वर्या राय-बच्चनने बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा झोकात एंट्री केलेय. 'जज्बा' या सिनेमातून कमबॅक केलेल्या अॅशने दमदार भूमिका साकरलेय. तिच्या या सिनेमाने पहिल्याच आठवड्यात १५.१४ कोटींची घसघशीत कमाई केलेय.

ऐश्वर्याच्या जज्बाची सर्वांनाच उत्सुकता होती.  बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी या सिनेमाची जादू चालली नाही. मात्र, शनिवार आणि रविवारी या दोन दिवशी चांगली कमाई झाली. जज्बा ४० कोटींची कमाी करण्याची शक्यता आहे. कारण १८५० स्क्रीन्सवर हा सिनेमा रिलीज झालाय.

शुक्रवारी ४.२३ कोटी रुपयांची कमाई जज्बाने केली होती. मात्र, शनिवारी ५.४९ कोटी रुपये होती. सुरुवातीच्या दोन दिवसांत ९.७२ कोटी रुपये कलेक्शन झाले. तिसऱ्या दिवशी चांगला गल्ला जमा झाला. ५.५२ कोटी रुपये कमाई करण्यात या सिनेमाला यश आले. याबाबत सिनेमाचे अभ्यासक तरण आदर्श यांनीच ट्विट करुन माहिती दिली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.