ब्रॅन्जेलिना : सहा मुलांचे आई-वडील अखेर विवाहबद्ध!

Last Updated: Thursday, August 28, 2014 - 23:10
ब्रॅन्जेलिना : सहा मुलांचे आई-वडील अखेर विवाहबद्ध!

पॅरीस : हॉलिवूडची सर्वात चर्चित जोडी एन्जेलिना जोली आणि ब्रॅड पिट अखेर लग्नाच्या बेडीत अडकलीय. 

या जोडप्याच्या प्रवक्यानं दिलेल्य माहितीनुसार, एन्जेलिना आणि ब्रॅड पिट शनिवारी फ्रान्समध्ये विवाहबंधनात अडकलेत. 

यावेळी, झालेल्या खाजगी सोहळ्यात या जोडप्याच्या कुटुंबातील मंडळी आणि मित्र मंडळी सहभागी झाले होते. पिट आणि जोलीनं स्थानिक कॅलिफोर्निया जजकडून लग्नाचं लायसन्सही मिळवलंय. 

या सोहळ्यासाठी एन्जेलिना-ब्रॅडची मुलंही सहभागी झाले होते. एन्जेलिना आपली मुलं मॅडॉक्स आणि पॅक्ससोबत आली होती... तर जहारा आणि विवेननं पेटल्स फेकले आणि शिलोह आणि नॉक्सनं त्यांना अंगठ्या दिल्या.  

'मिस्टर अॅण्ड मिसेस स्मिथ' चित्रपटाच्या निमित्ताने २००४ मध्ये एकत्र आलेल्या या जोडप्यानं आत्तापर्यंत लग्न केलं नसलं तरी ते एकत्र राहत होते. या पाच वर्षांच्या कालावधीत तीन मुलांना जन्म दिला, तर तीन मुलांना दत्तक घेतलं होतं. एप्रिल 2013 मध्ये एन्जेलिना आणि पिटनं आपली एन्गेजमेंट झाल्याचं जाहीर केलं होतं. काही दिवसांपूर्वी हे जोडपं वेगळं होणार अशा आशयाच्या बातम्या आल्या होत्या... पण, आता एन्जेलिना-पिटच्या लग्नाच्या बातमीनं त्यांच्या चाहत्यांना मात्र हायसं वाटलं असेल.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

First Published: Thursday, August 28, 2014 - 22:42
comments powered by Disqus