सोनम कपूर आणि साहिर बेरीचं ब्रेकअप!

बॉलिवूडची मसक्कली गर्ल सोनम कपूरचं तिच्या बॉयफ्रेड मॉडेल आणि बिझनेसमन साहिर बेरीसोबत ब्रेकअप झाल्याचं कळतंय. 

Updated: Aug 9, 2014, 07:29 PM IST
सोनम कपूर आणि साहिर बेरीचं ब्रेकअप! title=

मुंबई: बॉलिवूडची मसक्कली गर्ल सोनम कपूरचं तिच्या बॉयफ्रेड मॉडेल आणि बिझनेसमन साहिर बेरीसोबत ब्रेकअप झाल्याचं कळतंय. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जास्त दिल्ली, लंडन आणि गोव्यार साहिर राहतो. त्यामुळं सोनम आणि साहिरला लाँग डिस्टन्स रिलेशनशीप टिकवणं कठीण झालं होतं. 

अमेरिकेतून डिग्री घेतल्यानंतर साहिरनं लंडनहून इंटरनॅशनल बिझनेसचा कोर्स केलाय. भारतात परतल्यानंतर साहिर गोव्यात मॉडेलिंग करतोय. 

सोनम कपूर सध्या तिचा आगामी चित्रपट 'खूबसूरत'च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या चित्रपटात तिच्यासोबत पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.