ब्रिटीश मॉडेल समीरा अमिताभसाठी वेडी!

ब्रिटिश अभिनेत्री आणि मॉडेल समीरा मोहम्मद अलीला बॉलीवुड मेगास्टार अमिताभ बच्चनसोबत काम करण्याची इच्छा आहे. आगामी फिल्म ‘बी पोझेटिव्ह’ची अभिनेत्री समीरा सांगते की, बॉलीवुड मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या सोबत काम करणे माझे स्वप्न आहे.

Updated: Sep 17, 2014, 04:08 PM IST
ब्रिटीश मॉडेल समीरा अमिताभसाठी वेडी! title=

पणजी: ब्रिटिश अभिनेत्री आणि मॉडेल समीरा मोहम्मद अलीला बॉलीवुड मेगास्टार अमिताभ बच्चनसोबत काम करण्याची इच्छा आहे. आगामी फिल्म ‘बी पोझेटिव्ह’ची अभिनेत्री समीरा सांगते की, बॉलीवुड मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या सोबत काम करणे माझे स्वप्न आहे.

समीराने सांगितले की, ‘ भारतीय अभिनेत्यांमध्ये अमिताभ बच्चन माझे आवडते  अभिनेता आहेत. ते अद्भूत कलाकार आहेत. मी दुबईमध्ये त्याचे चित्रपट पाहूनच मोठी झाली आहे. त्यांच्यासोबत काम करणे मला स्वप्नासारखे आहे. 

ब्रिटनची 29 वर्षीय अभिनेत्री वेंकटेश कुमारच्या दिग्दर्शनात तयार होणारा चित्रपट ‘बी पॉझिटिव्ह’च्या शुटींगसाठी सध्या गोव्यात आहे. छोट्या बजेटचा हा चित्रपट इंग्रजी, हिंदी आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे. राज पुरोहित आणि निवेदिता विश्वास या चित्रपटातील इतर कलाकार आहेत. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.