अजय देवगणवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार?

छोट्या पडद्यावर दिसणाऱ्या एका पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे अभिनेता अजय देवगण अडचणीत येणार असं दिसतंय. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यासहीत इतर आरोप दाखल करण्याची मागणी करण्यात आलीय. 

Updated: Nov 20, 2015, 11:55 PM IST
अजय देवगणवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार? title=

ठाणे : छोट्या पडद्यावर दिसणाऱ्या एका पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे अभिनेता अजय देवगण अडचणीत येणार असं दिसतंय. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यासहीत इतर आरोप दाखल करण्याची मागणी करण्यात आलीय. 

वकील अमर श्रीबाद यांनी १४ ऑक्टोबर रोजी भिवंडी न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीत अजय देवगनवर पान मसाल्याची जाहिरात करण्यासाठी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. या तक्रारीवर स्थानिक न्यायालयानं पोलिसांना चौकशीचे आदेश दिलेत. ३० नोव्हेंबरपर्यंत याचा अहवाल पोलिसांना सादर करायचाय. 

यांसारख्या जाहिराती पाहून अनेक लोक पान मसाला खातात आणि तोंडाचा कॅन्सर होऊन मृत्यूमुखी पडतात. राज्यात गुटख्यावर बंदी असूनही अभिनेता अजय देवगननं पान मसाल्याची जाहिरात करत लोकांना हे खाण्यासाठी उद्युक्त केलं. पान मसाल्याच्या नावाखाली गुटखाच विकला जात आहे, असा आरोप या तक्रारीत श्रीबाद यांनी केलाय. 

आपल्या आठ वर्षांच्या मुलानं टीव्हीवर ही जाहिरात पाहिल्यानंतर पान मसाला खायची इच्छा व्यक्त केली... तेव्हाच आपण याविरुद्ध तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतल्याचं श्रीबाद यांनी म्हटलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.