पाहा अजय देवगणचा चित्रपट 'शिवाय'चे पहिले पोस्टर

 अजय देवगण दिग्दर्शक म्हणून आपला दुसरा चित्रपट 'शिवाय' मोठ्या पडद्यावर येत आहे. या चित्रपटाचे पहिले मोशन पोस्टर त्याने नुकतेच लॉन्च केले. हा चित्रपट २०१७ मध्ये मोठ्या पडद्यावर येणार आहे. 

Updated: May 14, 2015, 04:14 PM IST
पाहा अजय देवगणचा चित्रपट 'शिवाय'चे पहिले पोस्टर title=

मुंबई :  अजय देवगण दिग्दर्शक म्हणून आपला दुसरा चित्रपट 'शिवाय' मोठ्या पडद्यावर येत आहे. या चित्रपटाचे पहिले मोशन पोस्टर त्याने नुकतेच लॉन्च केले. हा चित्रपट २०१७ मध्ये मोठ्या पडद्यावर येणार आहे. 

अजय देवगण याच्या छातीवर शंकराचा टॅटू आहे. तो या चित्रपटात भगवान शंकराने प्रेरित एक संरक्षक, पालक आणि विनाशकच्या भूमिकेत दिसणार आहे. अजय देवगणने ट्विटरवर आपल्या चाहत्यांसाठी हे पोस्टर शेअर केले आहे. 

अजय या चित्रपटाचे निर्माताही आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून दिलीप कुमार आणि सायरा बानो यांची नात सायशा सैगल बॉलीवूडमध्ये पदार्पण करीत आहे. अजयने 'दृश्यम' चित्रपटाच्या शुटिंगसाठी 'शिवाय'ची शुटिंग २०१५ ऑक्टोबरपर्यंत थांबविण्यात आले आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.