Confirmed: सलमान खानही करणार बिग बॉस-8 हॉस्ट

बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान आणि टीवी रियल्टी शो बिग बॉसच्या फॅन्ससाठी एक मोठी बातमी. सलमान खानने बिग बॉस-८ होस्ट करण्यासाठी होकार दिल्याची पक्की बातमी आहे. 

Updated: Aug 12, 2014, 06:52 PM IST
Confirmed: सलमान खानही करणार बिग बॉस-8 हॉस्ट title=

मुंबई: बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान आणि टीवी रियल्टी शो बिग बॉसच्या फॅन्ससाठी एक मोठी बातमी. सलमान खानने बिग बॉस-८ होस्ट करण्यासाठी होकार दिल्याची पक्की बातमी आहे. 

भारताच्या टेलिव्हिजनमध्ये सर्वात विवादित आणि चर्चेत असलेल्या या बिग बॉसच्या गेल्या चार  सिझनचे होस्टिंग सलमान खानने केले होते. सलमानने या शोला होस्ट केल्यानंतर शो जबरदस्त हिट झाला होता. 

या बातमीची बिग बॉस प्रसारित करणाऱ्या चॅनलने पुष्टी केली आहे. की सलमानने हा शो होस्ट करण्यास होकार दिला आहे. सलमानने होकार दिल्यानंतर आता लागोपाठ पाच सिझन या शोला होस्ट करण्याचा विक्रम होणार आहे. 
या शो मधील वादांमुळे या शोला लोकप्रियता मिळते आणि जबरदस्त टीआरपी मिळतो. पण सलमानच्या उपस्थितीने या शोच्या टीआरपीमध्ये जबरदस्त वाढ होते. 

बिग बॉसच्या पहिल्या सिझनचे होस्टिंग अरशद वारसीने केले. दुसरा सिझन बिग ब्रदर विजेता शिल्पा शेट्टीने होस्ट केला तर त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी तिसऱ्या सिझनचे होस्टिंग केले. त्यानंतर सलमानने चार सिझन होस्ट केले आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.