'रईस' सिनेमावरुन पुन्हा नवा वाद होण्याची शक्यता

किंग खान शाहरुखच्या 'रईस' या मचअवेटेड सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झालाये...देशभरातील 3500 थिएटरमध्ये ‘रईस’चा ट्रेलर रिलीज करण्यात आला. या सिनेमात शाहरुख खान बरोबर पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलर लॉंच प्रसंगी सिनेमाचा निर्माता रितेश सिधवानी याने गरज पडल्यास माहिरा खानला भारतात प्रमोशनसाठी बोलावू असं वक्त्व्य केल्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Updated: Dec 7, 2016, 05:14 PM IST
'रईस' सिनेमावरुन पुन्हा  नवा वाद होण्याची शक्यता title=

मुंबई : किंग खान शाहरुखच्या 'रईस' या मचअवेटेड सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झालाये...देशभरातील 3500 थिएटरमध्ये ‘रईस’चा ट्रेलर रिलीज करण्यात आला. या सिनेमात शाहरुख खान बरोबर पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलर लॉंच प्रसंगी सिनेमाचा निर्माता रितेश सिधवानी याने गरज पडल्यास माहिरा खानला भारतात प्रमोशनसाठी बोलावू असं वक्त्व्य केल्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानी कलाकारांविरोधात मनसेने ऐ दिल है मुश्किल या सिनेमाच्या वेळी तीव्र आंदोलन पुकारले होते. तसेच कोणत्याच पाकिस्तानी कलाकाराला भारतात पाय ठेऊ देणार नाही अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे सिनेमाच्या निर्मात्यांनी घेतलेल्या या भूमिकेमूळे नवा वाद निर्माण होऊ शकतो. सिनेमाचं दिग्दर्शन राहुल ढोलकियाने केलं असून 'रईस' किंग खानसाठी कमबॅक सिनेमा ठरतो का हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे. जानेवारी महिन्यात हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे..