माझं एक सिक्रेट जे कोणालाच माहिती नाहीय - शाहरुख

बॉलिवूडचा किंग खान शाहरूख म्हणतो माझं आयुष्य जरी एक ओपन दिसतं. मात्र त्याच्या व्यक्तीमत्त्वातील अशा काही खास बाबी आहेत, ज्या कोणालाच माहित नाहीयेत. एका इंटरव्ह्यू दरम्यान, माझं जीवन खुलं पुस्तक आहे, असं तो म्हणाला. 

IANS | Updated: Aug 18, 2014, 02:31 PM IST
माझं एक सिक्रेट जे कोणालाच माहिती नाहीय - शाहरुख title=

मुंबई: बॉलिवूडचा किंग खान शाहरूख म्हणतो माझं आयुष्य जरी एक ओपन दिसतं. मात्र त्याच्या व्यक्तीमत्त्वातील अशा काही खास बाबी आहेत, ज्या कोणालाच माहित नाहीयेत. एका इंटरव्ह्यू दरम्यान, माझं जीवन खुलं पुस्तक आहे, असं तो म्हणाला. 

मी जिथं कुठं जातो, लोकं माझे फोटो घेतात... ट्विटरवर पाहतात... सर्व काही... मी खूश आहे की लोकं विचार करतात की ते माझ्याविषयी सर्व जाणतात. मात्र माझं एक गुपित आहे, ज्याबद्दल लोकांना माहिती नाहीय.  

शाहरुखचा आगामी चित्रपट आहे ‘हॅपी न्यू इअर’. हा चित्रपट दिवाळीत रिलीज होतोय. त्यानं याबद्दल सांगितलं, मनोरंजन, व्यवसाय, याबद्दल जागरूक होणं म्हणजे लोकांना काय आवडतं हे ठरवणं होय. निर्मितीप्रक्रिया ही खूप हळू प्रोसेस असते आणि बंद दरवाजाच्या मागे होते. माझी निर्मितीप्रक्रिया गुपित असते, जे कोणालाच माहित नसतं. मी फॅशनबद्दल बोलत नाहीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.