'दंगल' स्टार साक्षीनं खरेदी केलीय ही कार...

'दंगल'च्या यशानंतर अभिनेत्री साक्षी तन्वरनं हीनं एक लक्झरी कार खरेदी केलीय. 

Updated: Feb 10, 2017, 03:13 PM IST
'दंगल' स्टार साक्षीनं खरेदी केलीय ही कार...  title=

मुंबई : 'दंगल'च्या यशानंतर अभिनेत्री साक्षी तन्वरनं हीनं एक लक्झरी कार खरेदी केलीय. 

आता, 'व्होल्वो एस-90' या लक्झरी, स्टाईल आणि सुरक्षेच्या दृष्टीनं सुपरहीट गाडीतून प्रवास करताना साक्षी दिसणार आहे. 

स्वीडिश ऑटोमेकरची ही गाडी 2016 साली लॉन्च झाली होती. या गाडीचं 2.0 लीटर 4 सिलिंडर टर्बोचार्ज्ड डीझल सिलिंडर जास्तीत जास्त 190 ची पॉवर आणि 400 एनएमचा टॉर्क जेनरेट करतं.

याशिवाय या गाडीत 19 स्पीकर्स, 12.3 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर (9 इंच टच स्क्रीनसोबत), हेडसअप डिस्प्ले विथ नेव्हिगेशन आणि अॅपल कार प्ले असे अनेक फिचर्स आहेत. 

तसंच इको, कम्फर्ट आणि डायनामिक असे तीन ड्रायव्हिंग मोडही यामध्ये आहेत.  या गाडीची एक्स शोरूम किंमत जवळपास 53 लाख रुपये आहे.