दीपिका करणार सलमानबरोबर काम पण...

दीपिका पदुकोण आणि सलमान खान या दोघांनी आत्तापर्यंत एकदाही एकत्र काम केलेलं नाही.

Updated: Apr 18, 2016, 11:36 PM IST
दीपिका करणार सलमानबरोबर काम पण...  title=

मुंबई: दीपिका पदुकोण आणि सलमान खान या दोघांनी आत्तापर्यंत एकदाही एकत्र काम केलेलं नाही. प्रेम रतन धन पायो आणि सुलतान या चित्रपटांसाठी दीपिकाला विचारण्यातही आलं होतं, पण तिनं मात्र सलमानसोबतचे हे चित्रपट नाकारले. 

पण आता मात्र सलमान आणि दीपिका एकत्र काम करणार आहेत. कबीर खानच्या आगामी चित्रपटामध्ये हे दोघं प्रेक्षकांना पाहायला मिळतील. या चित्रपटामध्ये दीपिकाऐवजी कतरिना काम करेल अशी चर्चा होती, पण दीपिकानं कतरिनासमोर बाजी मारली. 

पण सलमानसोबत काम करण्यासाठी दीपिकानं मात्र कबीर खानपुढे एक अट घातली आहे. या चित्रपटामध्ये महत्त्वाचा आणि मोठा रोल असला पाहिजे असं दीपिकानं कबीरला सांगितलं आहे. सलमानच्या इतर चित्रपटांमध्ये अभिनेत्रींचा रोल हा छोटा असतो, त्यामुळे दीपिकानं ही मागणी केल्याचं बोललं जात आहे.