पाहा दीपिका पादुकोणचा 'किलर' लुक

अभिनेत्री दीपिका पादुकोण नेहमी वेगवेगळ्या चित्रपटात हटके लुक करत आलीय. तिचा सध्याचा आगामी चित्रपट 'फायडिंग फॅनी' मधला फर्स्ट लूक प्रसिद्ध झालाय.

Updated: Jul 3, 2014, 12:12 PM IST
पाहा दीपिका पादुकोणचा 'किलर' लुक  title=
फाईल फोटो

मुंबई : अभिनेत्री दीपिका पादुकोण नेहमी वेगवेगळ्या चित्रपटात हटके लुक करत आलीय. तिचा सध्याचा आगामी चित्रपट 'फायडिंग फॅनी' मधला फर्स्ट लूक प्रसिद्ध झालाय.

 
चित्रपटात 'अग्नि' नावाची भूमिका दीपिका करणार आहे. 

दीपिकानं ट्विटरवर तिचा फोटो शेअर केलाय.-
शॉर्ट ड्रेस घालून तिच्या डाव्या हातात रक्ताळलेला चाकू आणि घामानं भिजलेली... असा किलर लुक शेअर केलाय. 

 

#Angie #FIRSTLOOK #FINDINGFANNY pic.twitter.com/h9Y3XOAb2S

— Deepika Padukone (@deepikapadukone) July 3, 2014

 

'फायडिंग फॅनी' हा सिनेमा इंग्रजी आणि कोंकणी भाषेत बनवला जातोय. फिल्ममध्ये दीपिकासोबत अर्जुन कपूर, नसीरुद्दीन शाह, डिंपल कपाडिया, पंकज कपूर, केविन डिमेलो, अंजली पाटील आणि रणवीर सिंग ही दिसणार आहेत. 

९० मिनिटांचा हा सिनेमा १२ सप्टेंबरला रिलीज होईल. चित्रपटाचा दिग्दर्शक होमी अदजानिया सांगतोय की, 'चित्रपटाची कथा ही खूप गंमतीशीर आणि मनोरंजक असेल.' 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.