रणबीर- कतरिनाचा ब्रेक अप. दीपिकानं काय दिली प्रतिक्रिया ?

रणबीर आणि कतरिना यांच्यात ब्रेक अप झालं आहे, यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे.

Updated: Jan 29, 2016, 04:56 PM IST
 रणबीर- कतरिनाचा ब्रेक अप. दीपिकानं काय दिली प्रतिक्रिया ? title=

मुंबई: रणबीर आणि कतरिना यांच्यात ब्रेक अप झालं आहे, यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. पब्लिसिटी आणि प्रमोशनसाठी या बातम्या पसरवल्या जात असल्याचं बोललं गेलं, पण त्यात काहीही तथ्य नाही.
बिग बॉस सिझन 9 च्या फायनलमध्ये कतरिना आपला आधीचा बॉयफ्रेंड सलमानसोबत एकाच स्टेजवर दिसली.  पण स्टेजच्या मागे सलमाननं तिला रणबीर सोबतचं नातं विसरून पुढे जा, असा सल्लाही दिला. तो ही बिग बॉसच्या क्रु समोरच. 
तर रणबीर आणि कतरिनाच्या ब्रेक अपवर दीपिकानं भलतीच प्रतिक्रिया दिली. कतरिनाच्या आधी रणबीरसोबत रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या दिपीकाला रणबीरर-कतरिनाबद्दल विचारलं, तेव्हा तिनं प्रतिक्रिया देणं टाळलं, पण पुन्हा तोच प्रश्न विचारल्यावर दीपिका चिडली आणि तिथून निघूनच गेली.