कपिल शर्माच्या शोमध्ये लवकरच देविना बॅनर्जीची एन्ट्री

कपिल शर्माच्या शो मध्ये आता सीरियलमध्ये काम करणारी अभिनेत्री देविना बॅनर्जीची एन्ट्री होणार आहे.

Updated: Jul 1, 2016, 07:48 PM IST
कपिल शर्माच्या शोमध्ये लवकरच देविना बॅनर्जीची एन्ट्री  title=

मुंबई : कपिल शर्माच्या शो मध्ये आता सीरियलमध्ये काम करणारी अभिनेत्री देविना बॅनर्जीची एन्ट्री होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देविना किकू शारदाच्या पत्नीची भूमिका करणार आहे. 

कपिलच्या या शोमध्ये देविना हॉट आणि ग्लॅमरस अवतारामध्ये दिसणार आहे. कपिल शर्माच्या साडीच्या दुकानाबरोबर मी दिसेन असं देविना म्हणाली आहे. देविनाबरोबरच सूफी संगीतकार वडाली बंधू पुरनचंद वडाली आणि प्यारेलाल वडालीही कपिलच्या शोमध्ये दिसतील असं बोललं जात आहे.