फोटो पाहा : डिम्पी गांगुली एन्गेज्ड!

रिअॅलिटी शो स्टार डिम्पी गांगली ही नुकतीच एका नव्या नात्यात अडकलीय. 

Updated: Oct 13, 2015, 10:38 PM IST
फोटो पाहा : डिम्पी गांगुली एन्गेज्ड! title=

मुंबई : रिअॅलिटी शो स्टार डिम्पी गांगली ही नुकतीच एका नव्या नात्यात अडकलीय. 
 
दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांचा मुलगा राहुल महाजन आणि डिम्पी यांचा घटस्फोट झाल्यानंतर डिम्पीनं नव्या साथीदारासोबत आपलं नवं आयुष्य सुरु केलंय. 

'राहुल दुल्हनिया ले जाएगा' या कार्यक्रमामध्ये राहुल आणि डिम्पीनं सगळ्यांसमोर लग्न केलं होतं.... पण, या दोघांचं हे नातं जास्त काळ टिकू शकलं नाही. राहुलनं आपल्याला मारहाण केल्याची तक्रारही डिम्पीनं नोंदवली होती. 

रितसर घटस्फोट घेतल्यानंतर आता डिम्पी दुबई स्थित रोहित रॉय नावाच्या एका बिझनेसमनसोबत लवकरच लग्नही करतेय. नुकतीच, ही खुशखबर डिम्पीनं आपल्या ट्विटर अकाऊंटद्वारे दिलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.