कंगना राणावतचं मानधन आता दुप्पट

अभिनेत्री कंगना राणावतने आपल्या मानधनात दुप्पट वाढ केली आहे. एकामागोमाग सुपरहिट चित्रपट देणाऱ्या कंगना राणावतने, आता तिचे मानधन ३ कोटींवरून ६ कोटी केले आहे. 

Updated: Jul 7, 2015, 07:18 PM IST
कंगना राणावतचं मानधन आता दुप्पट title=

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावतने आपल्या मानधनात दुप्पट वाढ केली आहे. एकामागोमाग सुपरहिट चित्रपट देणाऱ्या कंगना राणावतने, आता तिचे मानधन ३ कोटींवरून ६ कोटी केले आहे. 

कंगनाने आपल्या अभिनयाच्या जोरावर ही किंमत मिळवली आहे. कंगनाचा अभिनय हवा असणाऱ्या निर्मात्यांना आता हे मानधन मान्य करावं लागणार आहे. कंगनाने नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. 

कंगनाच्या ‘तनु वेड्‌स मनु रिटर्न्स’च्या यशस्वी झाला आणि क्‍विन्सचे भाव एकदमच वधारले आहेत. कारण तनु वेड्‌स मनुने १०० कोटींचा पल्ला गाठून कंगना या क्षेत्रातील क्‍वीन असल्याचे सिद्ध केले आहे.

सर्वाधिक मानधन घेणाऱ्या प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण आणि करिना कपूरच्या यादीत आता कंगनाचाही समावेश झाला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.