कपिल शर्मा-कृष्णामधील कॉमेडी नाइट्सवरून 'किळसवाणा' वाद

 कॉमेडी नाइट्स विथ कपिल चा शेवटचा शो दोन आठवड्यापूर्वी झाला, त्यानंतर प्रेक्षकांचे दोन ग्रुप गट पडले. त्यातील एक कपिल शर्माच्या जाण्याने खूप नाराज आहे.

Updated: Feb 12, 2016, 09:11 PM IST
कपिल शर्मा-कृष्णामधील  कॉमेडी नाइट्सवरून 'किळसवाणा' वाद  title=

मुंबई :  कॉमेडी नाइट्स विथ कपिल चा शेवटचा शो दोन आठवड्यापूर्वी झाला, त्यानंतर प्रेक्षकांचे दोन ग्रुप गट पडले. त्यातील एक कपिल शर्माच्या जाण्याने खूप नाराज आहे.

तर दुसऱ्यांनी कॉमेडी नाइट्स liveमध्ये कृष्णा आणि भारतीला पसंत केले आहे.

कपिलच्या जाण्यानंतर कृष्णाने वार करताना म्हटले की, कपिल न लढता पळून गेला. पण आता ही लढा खूप किळसवाणा झाला असून कपिलनेही त्याला प्रत्युत्तर देण्याचे ठरविले आहे. त्याने कॉमेडी नाइट्स live ज्या टाइमला कलर्सवर प्रसारित होते त्याच वेळी आपला शो आणण्याचे ठरवले आहे.

कपिल सोनी टीव्हीवर कॉमेडी स्टाइल हा नविन प्रॉग्रॅमचे नियोजन करीत आहे. तो त्याच प्राइम टाइम स्लॉटला प्रसारित होणार आहे.