फिल्म रिव्ह्यू: सलमानच्या इतर चित्रपटांपेक्षा वेगळा आहे 'बजरंगी भाईजान'

 आज बॉलिवूडचा मोस्ट अवेटेड दबंग खान सलमान स्टारर बजरंगी भाईजान रुपेरी पडद्यावर झळकलाय. अशातच जो ऑलरेडी बिग स्क्रीनवर आपला दबदबा कायम ठेवून असलेला 'बाहुबली' बजरंगी भाईजान या सिनेमाला टक्कर देणार का?. हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jul 17, 2015, 12:11 PM IST
फिल्म रिव्ह्यू:  सलमानच्या इतर चित्रपटांपेक्षा वेगळा आहे 'बजरंगी भाईजान' title=

अपर्णा देशपांडे, झी मीडिया, मुंबई:  आज बॉलिवूडचा मोस्ट अवेटेड दबंग खान सलमान स्टारर बजरंगी भाईजान रुपेरी पडद्यावर झळकलाय. अशातच जो ऑलरेडी बिग स्क्रीनवर आपला दबदबा कायम ठेवून असलेला 'बाहुबली' बजरंगी भाईजान या सिनेमाला टक्कर देणार का?. हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

सलमान खानचा चित्रपट म्हटलं की, त्यात सलमानची दबंग स्टाईल, त्याचा अतरंगी डांस, एक-दोन अँटम साँग, सल्लू मियाँच्या पंच लाईन्स असा संपूर्ण मसाला पॅकेज हे आपण गृहित धरलं असतं. पण कबीर खानचा 'बजरंगी भाईजान' वेगळा आहे.  यात सलमान स्वत: न दिसता त्याच्या भूमिकेत दिसतोय. चित्रपटात केवळ एक छोटासा फाइट सीन आहे आणि आयटम साँग आणि पंच लाइन्स अजिबात नाही. तर मग म्हणाल हा सिनेमा पाहायचा तरी कशाला... तर सलमान खानचा हा चित्रपट त्याच्या गेल्या पाच वर्षातील चित्रपटांपेक्षा खूप वेगळा आणि चांगला आहे. 

याचा अर्थ असा नाही की, चित्रपटात काही कमतरता नाहीत. ज्याचं लॉजिकशी काही घेणं-देणं नाही अशा अनेक घटना यात दिसतात. कबीर खान यांनी मेनस्ट्रीम सिनेमाच्या अंतर्गत राहून एक सरळ घरगुती चित्रपट बनवलाय. ज्यात उपदेश न देता एक पॉलिटिकल स्टेटमेंट देण्यात आलंय. 

पटकथा

बजरंगी भाईजान ही कथा आहे पवन कुमार उर्फ बजरंगी भाईजान या हनुमान भक्त तरुणाची... सुखानं जगणाऱ्या या तरुणाच्या आयुष्यात एक ट्वीस्ट येतो, जेव्हा त्याची भेट एका ६ वर्षीय लहान मुलीशी होते.  पाकिस्तानहून भारतात वाट चूकलेली ६ वर्षांची शाहिदा जेव्हा बजरंगीला भेटते तेव्हा काय घडते?.. बजरंगी या मुलीला पाकिस्तानमध्ये परत तिच्या कुटुंबियांकडे घेउन जाण्याचा निश्चय करतो. यात त्याची साध देतो चांद नवाब जी भूमिका साकारली आहे अभिनेता नवाजुद्धीन सिद्धीकीनं.

विना पासपोर्ट आणि विजा बजरंगी भाईजान पाकिस्तानात पोहोचतो आणि  शाहिदाच्या कुटुंबियांना तो शोधण्यात यशस्वी होतो का? त्याला तिथं कोणकोणत्या संकटांचा सामना करावा लागतो? हे यात दाखवण्यात आलंय. सोबतच करीना कपूर अर्थात रसिकासोबतची त्याची लव्ह स्टोरी. 

दिग्दर्शन

कथा ऐकून आपल्याला वाटलं असेल की पाकिस्तानात शिरून बजरंगी सनी देओलच्या 'गदर' सारखा काही करेल. कथेत तशी अॅक्शन आणि डायलॉगसाठी स्कोप पण होता. मात्र कबीर खान यांचा हा चित्रपट याबाबतीत वेगळा आहे. इथं कलाकारांच्या भूमिका जशा सुरूवातीला दिसतात तशाच त्या कायम राहतात आणि चित्रपट आपला साधेपणा सोडत नाही.

सलमानची भूमिका बजरंगी खूप चांगल्या पद्धतीनं लिहिली गेलीय. बजरंगी एक-एक ब्राह्मण कुटुंबाशी संबंधित असतो जे की धार्मिक आहे. त्याचे वडील शहरात आरएसएसचे शाखा प्रमुख राहिलेले असतात आणि बजरंगी पण लहानपणापासून संघाच्या शाखेत जातो. तो सज्जन आहे, खोटं बोलत नाही, शुद्ध शाकाहारी आहे आणि दुसऱ्या धर्माच्या धार्मिक स्थळांवर तो जात नाही. चांदनी चौकात ज्या कुटुंबात तो राहतो ते मध्यमवर्गीय कुटुंब दाखवण्यात आलंय. अशात कट्टर ब्राह्मण कुटुंबात एक मुस्लिम पाकिस्तानी मुलगी येणं आणि जेव्हा बजरंगी आपली ओळख न लपवता पाकिस्तानच्या गल्ल्यांमध्ये मुलीचं घर शोधत फिरतो. तेव्हा कथेतील माणुसकी चित्रपटात दाखवण्यात आलीय. अशा चित्रपटांमध्ये नेहमी मोठमोठे डॉयलॉग आणि उपदेश असतात. पण 'बजरंगी भाईजान' यापासून वेगळा आहे, हेच चित्रपटाचं वैशिष्ट्ये. 

चित्रपटातील सर्वात मोठी कमकुवत बाजू

चित्रपटातील सर्वात मोठी कमतरता त्याची गती... एरवी सलमानच्या चित्रपटांमध्ये मसालेदार एडिटिंग आणि फास्ट घडणाऱ्या घटना असतात. मात्र 'बजरंगी भाईजान'मध्ये पहिल्या भागात कथेची गुंफण खूप धिम्यागतीनं आहे. प्रेक्षक वाट पाहत राहतात की, सलमान आता बोलेल, काही तरी करेल. 

तसंच सीमेवर पाकिस्तानी अधिकारी विना पासपोर्ट-विजा बजरंगीला आपल्या देशात येण्याची परवानगी देतात, आणि कसा पत्त्याशिवाय संपूर्ण पाकिस्तानात बजरंगी एका छोट्या झोपडीचा शोध घेतो. चित्रपटाचा क्लायमॅक्स तर आपल्या कसोटीवर खरा उतरू शकत नाही, मात्र तो असरदार नक्कीच आहे. कदाचित हेच सिनेमाचं यश असेल. 

इमेज चेंज करण्याचा असाच प्रयत्न काही वर्षांपूर्वी शाहरूख खाननं 'माय नेम इज खान' द्वारे केला होता. सलमानची बजरंगीची भूमिका म्हणजेच असाच हा प्रयत्न आहे. 

अभिनय

चित्रपटात सलमान खान आपल्या इतर चित्रपटांसारखा लाऊड दिसत नाही. हा बदल चांगला आहे. ६ वर्षीय हर्षालीला पाहून आपण आश्चर्यचकित व्हाल. न बोलता तिनं खूप चांगला अभिनय केलाय. तो चित्रपटाचा जीव आहे. 

मात्र चित्रपटात इंटरवलनंतर पाकिस्तानी रिपोर्टरच्या भूमिकेत नवाजुद्दीन सिद्धिकीची एंट्री दमदार आहे. त्याचा प्रत्येक सीन लाजवाब आहे. विशेष म्हणजे सलमान खानच्या चित्रपटांमध्ये नवाजुद्दीन सिद्धिकी टाळ्या खाऊन जातो. जर आपण सलमान खानचे फॅन्स नसाल तर नवाजुद्दीनसाठी हा चित्रपट पाहा. 

करीना कपूरला चित्रपटात स्क्रीनवर काही जास्त वेळ मिळाला नाहीय. मात्र ती चांगली दिसते. चित्रपटात ओम पुरी आणि राजेश शर्मा यांच्या सुद्धा छोट्या-छोट्या पण महत्त्वाच्या भूमिका आहेत. 

दिग्दर्शक कबीर खाननं चित्रपट भरकटू दिला नाहीय. चित्रपट धर्म, जात, सीमेच्या पलिकडे जावून माणुसकी जपणारा आणि महत्त्वाचा संदेश देणारा ठरलाय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.