सिंघम रिटर्न्स : 'बाजीराव'ला जबरदस्त डायलॉग्ज - अॅक्शन

जबरदस्त ‘अॅक्शन पॅक’ सिंघमनंतर आता या सिनेमाचा सिक्वल ‘सिंघम रिटर्न्स’ या विकेंडला आपल्या भेटीला आलाय

Updated: Aug 15, 2014, 12:10 PM IST
सिंघम रिटर्न्स : 'बाजीराव'ला जबरदस्त डायलॉग्ज - अॅक्शन title=

चित्रपट : सिंघम रिटर्न्स
दिग्दर्शक : रोहित शेट्टी
लेखक : साजिद-फरहाद
कथा : रोहित शेट्टी
कलाकार : अजय देवगन, करीना कपूर-खान, अमोल गुप्ते
संगीत : जीत गांगुली, अंकित तिवारी, यो यो हनी सिंग

जयंती वाघदरे (प्रतिनिधी) : जबरदस्त ‘अॅक्शन पॅक’ सिंघमनंतर आता या सिनेमाचा सिक्वल ‘सिंघम रिटर्न्स’ या विकेंडला आपल्या भेटीला आलाय. रोहित शेट्टीनं आजवर अनेक हिट सिनेमे दिलेत. खरं तर आजवर बिग स्क्रिनवर सिनेमाचे सिक्वल फार चालत नाही, असं चित्र अनेकदा आपण पाहिलंय. मात्र, रोहित शेट्टीची ‘गोलमाल’ सिरीज याला अपवाद ठरली. गोलमालचे सिक्वलही भरपूर गाजले. ‘सिंघम’ या ब्रँन्ड सिनेमाचा सिक्वल कसा आहे. त्याची खरी स्टोरी काय आहे, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत... 
 
कथा 
सिंघममधल्या बाजिराव सिंघमचं या सिनेमात प्रमोशन झालंय. बाजिराव सिंघम यात डीसीपी झालाय. हा डीसीपी बाजिराव सिंघम आणि भ्रष्टाचाराविरोधातला त्याचा लढा यांभोवती सिनेमाचं कथानक फिरतं. एक अत्यंत प्रामाणित, बिधास्त, धाडसी, कर्तव्यनिष्ठ अशा पोलिस ऑफिसरचा एका भ्रष्टाचारी धर्मगुरुसोबतचा लढा यात रेखाटण्यात आलाय.

पैशांनी भरलेल्या पोलीस व्हॅनमध्ये एका कॉन्स्टेबलचा मृतदेह सापडतो. या घटनेनंतर संपूर्ण पोलीस डिपार्टमेंट वादाच्या भोवऱ्यात सापडतं. बाजिराव सिंघम आणि त्याचे ऑफिसर्स कशाप्रकारे या सगळ्या गोष्टांवर मात करतात, अशा काहीशा ट्रॅकवरचं ‘सिंघम रिटर्न्स’ या सिनेमाचं कथानक आहे.
 
अभिनय 
अजय देवगन आणि त्याची जादू ‘सिंघम’ प्रमाणेच या सिनेमातही कमाल आहे. अजय देवगणनं साकारलेला डीसीपी ‘बाजिराव सिंघम’ याही सिनेमात आपली छाप सोडून जातो. सिंघम रिटर्न्स या सिनेमातला अजय देवगण नक्कीच भाव खाऊन जातो. त्याचा स्क्रिनवरचा प्रेझेन्स, त्याचा अभिनय आऊटस्टँडींग आहे. आपल्या भूमिकेला त्यानं 100टक्के न्याय दिलाय यात शंका नाही. अनेक ठिकाणी अजयच्या तोंडून मराठी डायलॉग्सही आपल्याला ऐकायला मिळतात, त्याचे उच्चार, त्याचा प्रयत्न बऱ्यापैंकी चांगला वाटतो. सिंघम रीटर्न्समध्ये अजयनं परफॉर्म केलेले अॅक्शन सीन्स खरं तर त्याच्या सिंघम या सिनेमाच्या तुलनेत एक पाऊल पुढे वाटतात. एका शूट आऊटच्या सीनमध्ये तो एका गाडीला जाऊन जोरात आपटतो, तर एका सीनमध्ये गाडी दरवाजा उघडताच तो व्हिलनच्या अंगावर जाऊन हल्ला करतो. हे सीन्स सिनेमा संपल्यानंतरही तुमच्यासोबत राहतात.
 
करीना कपूर - खान
करीना कपूरनं साकारलेली ‘अन्वी’ खुपच क्युट, बबली, गर्ल नेक्स्ट डोअर, बिनधास्त अशी मुलगी आहे. करीना खरंतर या सिनेमा एक रिलीफ फॅक्टर वाटते. तिनं बऱ्याच ठिकाणी ह्युमर क्रिएट करण्याचा प्रयत्न केलाय, कॉमेडी करण्याचा प्रयत्न केलाय... आणि तिचा तो प्रयत्न यशस्वीही झालाय. तिच्या डायलॉगमध्ये तिनं बऱ्याचदा मराठी भाषेचा वापर केलाय. करीनानं या सिनेमासाठी खास मराठीचे धडेही घेतले होते त्यामुळे तिनं उचारलेला एक एक शब्द फिट बसलाय. एका सीनमध्ये करीना एका पत्रकाराशी भांडताना दिसते, त्या सीनमध्येही तिचा कॉमेडी टायमिंग, तिची नटखट अदा खुपच अपिलिंग वाटते. सिंघमसारख्या अॅक्शन पॅक्ड ड्रामा सिनेमामध्ये हिरोईनला फार वाव नसतो, तरी या सिनेमातली मराठमोळी अव्नी म्हणजेच करीना कपूर-खान लक्षात राहते.
 
अमोल गुप्ते 
अभिनेता अमोल गुप्ते आणि त्यांनी साकारलेला एक भ्रष्ट धर्मगुरु ‘स्वामी’ जबरदस्त वाटतो.. त्यांचा अभिनय कमाल आहे, त्यांच्या वाट्याला आलेला स्वामीही त्यांनी परफेक्ट निभावलाय.
 
सहअभिनेते-अभिनेत्री
अमोल गुप्ते सह, दया नाइक, अनुपम खेर या सगळ्यांनीही आपआपल्या भूमिका चोख पार पाडल्या आहेत. महेश मांजरेकर, स्मीता तांबे, सोनाली कुलकर्णी, जितेंद्र जोशी सारखे मराठीतले कलावंतही यात आपल्याला दिसतात..
 
दिग्दर्शन  
दिग्दर्शक रोहीत शेट्टी आणि त्याची जादू यातही पहायला मिळते. पण, जर का या सिनेमाची पहिल्या सिंघमसोबत तुलना करण्यात आली तर दिग्दर्शक रोहित शेट्टी कुठेतरी कमी पडलाय असं नक्कीच जाणवतं. सिनेमा सुरु झाल्यापासूनच आपण सतत या फिल्ममध्ल्या त्या स्पार्कच्या, त्या ग्रिपच्या शोधात राहतो, पण सिनेमातला तो ग्रिप आणण्यात रोहीत शेट्टी थोडासा मागे पडलाय. 2011 साली आलेल्या पहिल्या सिंघमच्या तुलनेत सिंघम रीटर्न्समध्ये ज्या गोष्टींवर जास्त प्रयत्न करण्यात आलेत, ती म्हणजे सिंघम रीटर्न्समधले अॅक्शन्स... खरं तर स्टोरीही चांगली आहे पण त्याची मांडणी करण्यात तो ग्रिप, तो होल्ड मिसिंग वाटतो.
 
संगीत 
अंकीत तिवारी, मीट ब्रदर्स, यो यो हनी सिंग यांनी सिनेमाला दिलेलं संगीत ठिक ठाक वाटतं... यो यो हनी सिंगनं संगीत बद्ध केलेलं ‘आता माझी सटकली’ हे गाणं सोडलं तर बाकी सगळं बरं-बरं आहे. याच बरोबर सिनेमातल्या बॅकग्राऊंड स्कोअरमध्येही तसं काही नाविन्य जाणवत नाही..
 
शेवटी काय तर...  
सिनेमा पाहताना कुठेही 2011 साली आलेल्या पहिल्या ‘सिंघम’शी या सिनेमाची तुलना करु नका... खूप अपेक्षा ठेऊ नका आणि जास्त लॉजिक शोधण्याचाही प्रयत्नही करु नका. नाही तर केवळ निराशाच तुमच्या हाती लागेल.
 
रेटींग 
अजय देवगण, करीना कपूर-खान, अमोल गुप्ते यांचे जबदस्त परफॉर्मन्स, साजिद फरहाद या जोडीनं लिहलेल्या डायलॉग्जचा इम्पॅक्ट, रोहीतनं कोरिओग्राफ केलेले अॅक्शन सीन्स या सगळ्या गोष्टींमुळे या सिनेमाला आम्ही देतोय 2.5 स्टार्स...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.