फिल्म रिव्ह्यू : खऱ्या अर्थानं रणबीर - दीपिकाचा 'तमाशा'

Updated: Nov 27, 2015, 02:23 PM IST
फिल्म रिव्ह्यू : खऱ्या अर्थानं रणबीर - दीपिकाचा 'तमाशा' title=

 

सिनेमा : तमाशा
दिग्दर्शक - लेखक : इम्तियाज अली
निर्माता : साजिद नाडियादवाला
संगीत : ए आर रहमान
कलाकार : दीपिका पादूकोण, रणबीर कपूर
वेळ : १३९ मिनिटे

 

जयंती वाघधरे, मुंबई : आज रणबीर कपूर, दीपिका पादूकोण 'स्टारर द मोस्ट अवेटेट' तमाशा हा सिनेमा आज रुपेरी पडद्यावर झळकलाय. 

इम्तियाज अली दिग्दर्शित तमाशा ही 'वेद' आणि 'तारा' या दोघांची ही गोष्ट... फ्रान्सच्या 'कोर्सिका' या बेटावर या दोघांची भेट होते. हे दोघे एकमेकांशी गंमत म्हणून खोटा खोटा संवाद साधत असतात... तारा आणि वेद या दोघांना वेगळं आयुष्य जगायचं असतं... म्हणून यापुढे एकमेकांना भेटायचं नाही असा निर्णय ते घेतात... त्यानंतर काय घडतं हा पाहणं खरंतर मजेशीर आहे.

अधिक वाचा - दीपिका - रणबीरनं प्रदर्शनाआधीच 'तमाशा'ची स्टोरी केली लीक!

ही एक अशी लव्हस्टोरी आहे, ज्या कहाणीला वेद आणि तारा हे दोन पात्र, एका वेगळ्याच उंचीवर घेउन जायचा प्रयत्न करताना दिसतायत. त्याच्या या प्रयत्नाला, त्यांच्या विचारांना, त्यांच्या कहाणीचा शेवट त्यांच्या मनाप्रमाणे होतो का? हे पाहायला तुम्हाला सिनेमागृहात जावंच लागेल. एक हटके प्रयत्न या सिनेमाच्या माध्यमातून दिदर्शक इम्तियाज अली यांनी केलाय एवढं मात्र नक्की...

व्हिडिओ : दीपिका-रणबीरचं 'अगर तुम साथ हो...'

दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी नेहमीप्रमाणे काहीतरी हटके करायचा प्रयत्न केलाय. मध्यंतराच्या आधी सिनेमा खूपच रंजक वाटतो, इंटरेस्टींग वाटतो... इंटरव्हलनंतर सिनेमाच्या पटकथेमुळे सिनेमा थोडा कमजोर असल्याचं जाणवतं. 

VIDEO : पाहा, रणबीर-दीपिकाची 'मटरगष्टी'

या सिनेमात खऱ्या अर्थानं बाजी मारली आहे ती म्हणजे अभिनेता रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण या दोन कलाकारांनी... या दोघांचाही अभिनय कमाल झालाय. याचबरोबर तमाशाचे आणखी काही यूएसपी पाहिले तर या सिनेमासाठी निवडण्यात आलेल लोकेशन्स, ए आर रेहमान यांचं संगीत लाजवाब झालंय. तमाशाचे डायलॉग्सही फूल्ल टू पैसा वसूल आहेत.

VIDEO - दीपिका-रणबीरची भूमिका असलेल्या 'तमाशा'चा प्रोमो रिलीज

या सिनेमाचे हे सगळे फॅक्टर्स लक्षात घेता आम्ही 'तमाशा' या सिनेमाला देतेय ३ स्टार्स...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.