फिल्म रिव्ह्यू : आयुष्याला म्हणा 'वेलकम जिंदगी'!

 स्वप्निल जोशी आणि अमृता खांविलकर स्टारर 'वेलकम जिंदगी' हा सिनेमा देखील आज प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. 'आत्महत्या' असा एक अतिशय संवेदनशील विषय या सिनेमात हाताळण्यात आलीय. 

Updated: Jun 26, 2015, 05:12 PM IST
फिल्म रिव्ह्यू : आयुष्याला म्हणा 'वेलकम जिंदगी'! title=

चित्रपट : वेलकम जिंदगी
दिग्दर्शक : उमेश घाडगे
कलाकार : स्वप्निल जोशी, अमृता खानविलकर, महेश मांजरेकर, पुष्कर श्रोत्री, मोहन आगाशे, उर्मीला कानेटकर 

मुंबई : स्वप्निल जोशी आणि अमृता खांविलकर स्टारर 'वेलकम जिंदगी' हा सिनेमा देखील आज प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. 'आत्महत्या' असा एक अतिशय संवेदनशील विषय या सिनेमात हाताळण्यात आलीय. 

कथानक :
उमेश घाडगे दिग्दर्शित 'वेलकम जिंदगी' ही कथा आहे एका अशा मुलीची जी आयुष्याला कंटाळेली असते. तिची आई ती खूप लहान असतानाच वारते, तिचे बाबा दुसरं लग्न करतात, तिची बॉयफ्रेन्डही तिला सोडून जातो. या सगळ्या गोष्टी तिच्या आय़ुष्यात घडत असताना ती अखेर अशा जगण्याला कंटाळते आणि आत्महत्या करायचा विचार करते... मग अचानक एन्ट्री होते सिनेमातल्या हिरोची म्हणजेच आनंद प्रभूची... ही भूमिका साकारलीय स्वप्निल जोशीनं...

आनंद प्रभू हा एका सामाजिक संस्थेचा मालक असतो. या संस्थेचं नाव आहे 'हॅपी एन्डींग सोसायटी'... हा आनंद प्रभू तिला या सगळ्या परिस्थितीतून  बाहेर काढण्यासाठी त्याच्या 'हॅपी एन्डींग सोसायटी'मध्ये घेउन जातो. मग काय घडतं? थोडी फार स्टारी तुमच्याही लक्षत आलीच असेल... तर अशा काहीशा पार्श्वभूमीवरचा हा सिनेमा आहे... 

कलाकार आणि अभिनय
अमृता खानविनकर खरंतर तिनं साकारलेल्या मीरा सबनीस या व्यक्तिरेखेवरच सिनेमाची कथा गुंफण्यात आली आहे. अमृताचा अभिनय बरा झालाय तर दुसरीकडे स्वप्निल जोशीचंही काम छान झालंय.

सिनेमात महेश मांजरेकर, पुष्कर श्रोत्री, मोहन आगाशे, उर्मीला कानेटकर ही सगळे नटमंडळी 'सरप्राईज पॅकेज'मध्ये दिसतायत. सिनेमाची स्टारी जरी चांगली असलीतरी त्याची मांडणी फसलीय. सिनेमाचा फ्लो मिसिंग वाटतो.. दिगदर्शकानं या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यायला हवं होतं.

या सगळ्या गोष्टी पाहता या सिनेमाला आम्ही देतोय २.५ स्टार्स... 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.