कपिल शर्माच्या नव्या शोच्या सेटची पहिली झलक

मुंबई : कॉमेडी नाईट्स विथ कपिल फेम कपिल शर्मा आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर येतोय.

Updated: Mar 30, 2016, 11:44 AM IST
कपिल शर्माच्या नव्या शोच्या सेटची पहिली झलक title=

मुंबई : कॉमेडी नाईट्स विथ कपिल फेम कपिल शर्मा आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर येतोय. 'द कपिल शर्मा शो' हा नवीन कार्यक्रम घेऊन तो आता प्रेक्षकांसमोर येतोय. या नव्या शोच्या नवीन सेटचा एक फोटो त्याने नुकताच ट्वीट केलाय.

कपिल शर्माचा हा नवीन शो २३ एप्रिलपासून सोनी टीव्हीवर सुरू होणार आहे. पहिल्याच भागाच्या चित्रीकरणात बॉलिवूडचा किंग खान शाहरुख कपिलच्या कार्यक्रमात हजेरी लावणार आहे.

शनिवारी आणि रविवारी रात्री ९ वाजता म्हणजेच आठवड्यातले दोन दिवस हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कपिलसोबतच यात सुनील ग्रोवर, अली असगर, किकू शारदा, सुमोना चक्रवर्ती, नवज्योतसिंग सिद्धू आणि चंदन प्रभाकरही असणार आहेत.