झी युवावरील मालिकांमध्ये बाप्पाचे आगमन !

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या, सगळ्यांची विघ्ने क्षणात दूर करणाऱ्या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या गणरायाचे दरवर्षी संपूर्ण जगभरात मोठ्या जल्लोषात स्वागत होते. बाप्पाच्या आगमना अगोदरच त्याच्या स्वागताची तयारी सर्वत्र सुरु झालेली असते. अश्या या लाडक्या बाप्पाचे आगमन झी युवावरील मालिकांमध्ये झालेले असून मालिकांच्या सेटवर उत्साहाचे, आनंदाचे वातावरण आहे. अवघ्या दोनचं आठवड्यामध्ये प्रेक्षकांची मने जिंकलेल्या बन मस्का, फ्रेशर्स, इथेच टाका तंबू, श्रावणबाळ रॉकस्टार आणि युवागिरी या मालिकांमध्ये गणरायाचे दर्शन प्रेक्षकांना होणार आहे.

Updated: Sep 1, 2016, 11:15 AM IST
झी युवावरील मालिकांमध्ये बाप्पाचे आगमन !  title=

मुंबई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या, सगळ्यांची विघ्ने क्षणात दूर करणाऱ्या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या गणरायाचे दरवर्षी संपूर्ण जगभरात मोठ्या जल्लोषात स्वागत होते. बाप्पाच्या आगमना अगोदरच त्याच्या स्वागताची तयारी सर्वत्र सुरु झालेली असते. अश्या या लाडक्या बाप्पाचे आगमन झी युवावरील मालिकांमध्ये झालेले असून मालिकांच्या सेटवर उत्साहाचे, आनंदाचे वातावरण आहे. अवघ्या दोनचं आठवड्यामध्ये प्रेक्षकांची मने जिंकलेल्या बन मस्का, फ्रेशर्स, इथेच टाका तंबू, श्रावणबाळ रॉकस्टार आणि युवागिरी या मालिकांमध्ये गणरायाचे दर्शन प्रेक्षकांना होणार आहे.

'बन मस्का' मालिकेमध्ये सौमित्रच्या घरामध्ये बाप्पाचे आगमन झाले असून पर्यावरण स्नेही अशाप्रकारची आरास केलेली आहे. सोमित्र, मैत्रेयी आणि त्यांचे मित्रमंडळ या सगळ्यांनी मिळून ही आरास सजवलेली असून बाप्पाच्या आवडीचे मोदक सौमित्रच्या आईने प्रसाद म्हणून बनविले आहेत. गणेशाच्या स्वागतासाठी मैत्रेयीने पहिल्यांदा सुंदर अशी साडी घालून सौमित्रला सरप्राईझ दिले आहे.

'इथेच टाका तंबू' या मालिकेमध्येदेखील आपल्याला गणपतीची एक कथा बघायला मिळणार आहे. रामाश्रय रिसोर्टमधील प्रत्येकालाच गणपतीची चाहूल लागली आहे. पण या मालिकेतील कपिल एका धर्मसंकंटात पडतो कारण रिसोर्टमध्ये खास गणपतीसाठी सजविलेल्या मखरमध्ये गणपती बाप्पाची वडिलोपार्जित मूर्ती नाहीये, पहिले कपिल या गोष्टीकडे दुलर्क्ष करतो पण हि, मूर्ती वडिलोपार्जित असल्या कारणाने तो या मूर्तीचा शोध लाविण्याचे ठरवतो. कपिल या मूर्तीचा शोध कसा लावतो आणि कशी रामाश्रयमध्ये बाप्पाची स्थापना होते हे बघणे नक्कीच रंजक असणार आहे.

'फ्रेशर्स' मालिकेमधील मित्र - मैत्रिणीच्या टोळीने सुध्दा गणरायाचे त्यांच्या अंदाजात स्वागत केले आहे. धम्माल, मस्तमोला लालबागचा धवल याच्या घरीदेखील गणू बाप्पाची स्थापना करण्यात आली आहे आणि त्याच्या दर्शनाला स्लेफी क्वीन मनवा, नीरव आणि सम्राट हे देखील गेले आहेत. गर्लस हॉस्टेलमध्ये रेणुका हिने एका वेगळ्याच पद्धतीने गणपतीची स्थापना केली आहे. फ्रेशर्सच्या मित्र मंडळीनी लालबागच्या राजाचेदेखील दर्शन घेतले आहे. 

'श्रावणबाळ रॉकस्टारमध्ये' ऋषिकेशने गोड अशी गणपतीची मूर्ती बनवली असून अतिशय सुंदर अश्या मखर मध्ये त्याची स्थापना करण्यात आली आहे. ऋषिकेश म्हणजेच नीरव याने हि गणेशाची मूर्ती स्वत: दोन दिवस जागून बनवली आहे.

'युवागिरी' या कार्यक्रमामध्ये स्नेहा चव्हाण आणि अपूर्व रांझणकर यांनी पुण्यातील दोन गणपतींचे दर्शन घेतले. पुण्यातील पेशवेकालिन त्रिशुंड गणपती आणि मद्रासी गणपती यांचे दर्शन प्रेक्षकांना युवागिरीमध्ये येत्या ५ सप्टेंबरला आणि ६ सप्टेंबरला होणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये गणपती बाप्पाचे आवडते उकडीचे मोदक याची माहितीदेखील प्रेक्षकांना मिळणार आहे.   

तुम्हांला हि सगळी मज्जा आणि बाप्पाचे दर्शन झी युवा गणपती विशेष आठवड्यात सगळ्या मालिकांमध्ये बघायला मिळणार आहे.