आमीरच्या दंगलमध्ये मुलीचा कोच झाला हा मराठी अभिनेता...

 विहीर, देऊळ या चित्रपटांनी राष्ट्रीय पातळीवर आपलं नाणं खणखणीत करणारा अभिनेता गिरीश कुलकर्णी आमीर खानच्या दंगल चित्रपटात दिसणार आहे. 

Updated: Nov 30, 2016, 05:02 PM IST

मुंबई :  विहीर, देऊळ या चित्रपटांनी राष्ट्रीय पातळीवर आपलं नाणं खणखणीत करणारा अभिनेता गिरीश कुलकर्णी आमीर खानच्या दंगल चित्रपटात दिसणार आहे. 

आमीर खानच्या दंगल चित्रपटाचे तिसरे गाणे रिलीज झाले. त्यात एका दृश्यात आमीर खानच्या मोठ्या मुलीचा कुस्तीचा प्रशिक्षक म्हणून गिरीश कुलकर्णी दिसत आहेत. 

यात गिरीशची एक झलक दिसली आहे. पण त्याचा रोल किती महत्त्वाचा आहे हे चित्रपट पाहिल्यावर लक्षात येणार आहे. 

पाहा  गिरीशची या गाण्यातील झलक...