ऋषी कपूरसोबत असलेल्या या महिलेला ओळखलंत का?

अभिनेता ऋषी कपूरसोबत ही स्त्री कोण दिसतेय? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल... या स्त्रीला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय का?

Updated: Jul 1, 2015, 02:48 PM IST

मुंबई : अभिनेता ऋषी कपूरसोबत ही स्त्री कोण दिसतेय? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल... या स्त्रीला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय का?

खरं म्हणजे, बऱ्याच वर्षानंतर पहिल्यांदा पाहिलं तेव्हा खुद्द ऋषी कपूरनंही अगोदर या स्त्रीला ओळखलं नव्हतं... पण, नंतर मात्र आपल्या या सहअभिनेत्रीची ओळख पटलीच.

होय, ही स्त्री म्हणजे दुसरं-तिसरं कुणीही नसून नव्वदचं शतक गाजवणारी मीनाक्षी शेषाद्री आहे. मीनाक्षीनं नुकतंच आपल्या सहअभिनेत्याची भेट घेतली. मीनाक्षी आणि ऋषी कपूर यांनी 'दामिनी' या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. सनी देओलनंही या सिनेमात महत्त्वाची भूमिका निभावली होती. 

सनी देओलच्या आगामी 'घायल रिटर्न्स'मध्ये मीनाक्षी एक कॅमिओ करणार अशी चर्चा सुरू होती. पण, मीनाक्षीनं मात्र ही चर्चा खोटी असल्याचं स्पष्ट केलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.