नमस्ते इंडीया! हॅप्पी होली - एम्मा वॉटसन

हॉलिवूड अभिनेत्री एम्मा वॉटसनने भारतीयांना उद्देश्यून एक व्हिडीओ पोस्ट केलाय,ज्यात ती नमस्ते बोलून होळीच्या शुभेच्छा देताना दिसतेय. 

Updated: Mar 11, 2017, 11:45 AM IST
नमस्ते इंडीया! हॅप्पी होली - एम्मा वॉटसन title=

नवी दिल्ली : हॉलिवूड अभिनेत्री एम्मा वॉटसनने भारतीयांना उद्देश्यून एक व्हिडीओ पोस्ट केलाय,ज्यात ती नमस्ते बोलून होळीच्या शुभेच्छा देताना दिसतेय.

हॅरी पॉटर सिरीजमधून जगभरात प्रसिध्द झालेल्या एम्मा वॉटसनचा 'ब्युटी अँड बीस्ट' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. आपला सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावा, यासाठी कलाकार प्रमोशनसाठी वेगवेगळ्या कल्पना लढवत असतात. 

एम्माकडूनही तिच्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी हा व्हिडीओ लाँच करण्यात आलाय. त्यात ती म्हणते, 'नमस्ते इंडीया. तुम्हाला होळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि 'ब्युटी अँड बीस्ट' बघायला विसरु नका.'

येत्या १७ मार्चला हा सिनेमा चित्रपटगृहात भेटीला येईल. हा 3D रोमँटिक-म्युझिकल सिनेमा आहे. या चित्रपटात एम्मा वॉटसनसोबत डॅन स्टीवन्स आणि ल्यूक इवांससुध्दा दिसून येतील.