'हॅपी न्यू इअर'चा 'ओपनिंग' धमाका!

बॉलिवूडचा किंग शाहरुख खान याच्या नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘हॅपी न्यू इअर’ या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केलीय. या सिनेमानं पहिल्याचं दिवशी ४४.९७ करोड रुपयांची कमाई केलीय. 

Updated: Oct 25, 2014, 04:40 PM IST
'हॅपी न्यू इअर'चा 'ओपनिंग' धमाका! title=

नवी दिल्ली : बॉलिवूडचा किंग शाहरुख खान याच्या नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘हॅपी न्यू इअर’ या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केलीय. या सिनेमानं पहिल्याचं दिवशी ४४.९७ करोड रुपयांची कमाई केलीय. 

सिनेविश्लेषक तरण आदर्शनं ट्विटरवर या सिनेमान पहिल्याचं दिवशी ४४.९७ करोड रुपये कमाई केल्याचं म्हटलंय. सिनेमानं हिंदीत ४२.६२ करोड, तेलगुमध्ये १.४३ करोड आणि तामिळमध्ये ९२ लाख रुपयांची कमाई केलीय. 

शाहरुखसोबतच दीपिका पादूकोण, अभिषेक बच्चन, बोमन ईरानी, जॅकी श्रॉफ, सोनू सूद, विवान शाह यांसारख्या कलाकारांची तगडी कास्ट या सिनेमात दिसतेय. हा सिनेमा शुक्रवारी सिनेमाघरांत दाखल झालाय. 

‘मल्टिमीडिया कम्बाइन्स’च्या राजेश थडानी यांच्या म्हणण्यानुसार, हॅपी न्यू इअरचं बंपर ओपनिंग झालंय. सगळ्याच ठिकाणच्या सिनेमाघरांत जवळपास ८० टक्के सीटस फुल्ल होते. विकेन्डला हा सिनेमा नक्कीच हाऊसफुल्ल असेल.

केवळ प्रमोशनचाच नाही तर दिवाळीचे दिवस असल्यामुळे आणि सलग सुट्ट्या आल्याचाही सिनेमाला चांगलाच फायदा झालाय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.