‘हॅरी पॉटर’ फेम डेव्हिड लिगेनोचा मृतदेह सापडला

Last Updated: Saturday, July 12, 2014 - 15:05
‘हॅरी पॉटर’ फेम डेव्हिड लिगेनोचा मृतदेह सापडला

लॉस एन्जेलिस : हॉलिवूडला एक जबरदस्त धक्का बसलाय. ‘हॅरी पॉटर’ या गाजलेल्या सिनेमात पाहायला मिळालेला अभिनेता डेव्हिड लिगेनो याचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागलाय. 

यूएस पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा डेव्हिड लिगेनो मृत अवस्थेत सापडले. ते 50 वर्षांचे होते... ‘डेथ व्हॅली’मध्ये डेव्हिडचा मृतदेह सापडला. 

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लिगेनो याचा मृत्यू उष्णतेमुळे (heat related issues) झाल्याचं सांगण्यात येतंय. डेव्हिडचं शव पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 First Published: Saturday, July 12, 2014 - 13:48


comments powered by Disqus