सप्तपदी झालीच नाही, आसिन-राहुलच्या लग्नातून २१ पंडित माघारी

मंगळवारी अभिनेत्री असिन आणि मायक्रोमॅक्सचा सहसंस्थापक राहुल शर्मा यांचा विवाह पार पडला. पण, या संध्याकाळी हिंदू पद्धतीनं झालेल्या या विवाह सोहळ्यात सप्तपदीचा विधी पूर्ण न करताच २१ नाराज पंडितांनी काढता पाय घेतला. 

Updated: Jan 20, 2016, 11:59 AM IST
सप्तपदी झालीच नाही, आसिन-राहुलच्या लग्नातून २१ पंडित माघारी title=
सौ. फेसबूक

नवी दिल्ली : मंगळवारी अभिनेत्री असिन आणि मायक्रोमॅक्सचा सहसंस्थापक राहुल शर्मा यांचा विवाह पार पडला. पण, या संध्याकाळी हिंदू पद्धतीनं झालेल्या या विवाह सोहळ्यात सप्तपदीचा विधी पूर्ण न करताच २१ नाराज पंडितांनी काढता पाय घेतला. 

मंगळवारी सकाळी असिन-राहुलचा विवाह सोहळा ख्रिश्चन पद्धतीनं पार पडला... त्यानंतर सायंकाळी हिंदू रितीरिवाजानुसार विवाह पार पडला. हा सोहळा तब्बल दोन तासांपर्यंत सुरु होता. सायंकाळी ६.३० वाजता सुरू झालेल्या विधी ८.३० वाजता संपल्या. पण, या हायप्रोफाईल लग्नात एक ड्रामाही पाहायला मिळाला.

 

या लग्नासाठी वेडिंग कॉन्ट्रॅक्टरनं २१ पंडितांना प्रत्येकी २१०० रुपये दक्षिणा देण्याचं कबूल केलं होतं... पण, जेव्हा पंडित हॉटेलमध्ये पोहचले तेव्हा त्यांना केवळ ५०० रुपये दक्षिणा देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे पंडित मात्र चांगलेच नाराज झाले. शिवाय असिन-राहुलच्या लग्नात कमी वयाच्या पंडितांची गरज असल्याचं सांगण्यात आल्यानं पंडित माघारी फिरले. 

असिन - राहुलचा विवाह सोहळा दिल्लीच्या दुसित देवरान या लग्झरी हॉटेलमध्ये पार पडला.