5 वर्षात 15 कोटी कर भरणाऱ्या कपीलचं उत्पन्न किती?

मागच्या पाच वर्षांपासून मी 15 कोटी रुपये कर भरला आहे, तरीही माझं ऑफिस बांधण्यासाठी मुंबई महापालिकेला 5 लाख रुपयांची लाच द्यावी लागते.

Updated: Sep 10, 2016, 07:54 PM IST
5 वर्षात 15 कोटी कर भरणाऱ्या कपीलचं उत्पन्न किती? title=

मुंबई : मागच्या पाच वर्षांपासून मी 15 कोटी रुपये कर भरला आहे, तरीही माझं ऑफिस बांधण्यासाठी मुंबई महापालिकेला 5 लाख रुपयांची लाच द्यावी लागते. कुठे आहेत अच्छे दिन, असं ट्विट कपील शर्मानं केलं होतं. हे ट्विट करताना कपीलनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग केलं होतं. कपीलच्या या ट्विटमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. 

5 वर्षात 15 कोटी रुपयांचा कर भरल्याचा दावा करणाऱ्या कपीलचं वार्षिक उत्पन्न किती याबाबत मात्र आता चर्चा सुरु झाल्या आहे. कपील शर्मा त्याच्या प्रत्येक शो मधून 60 ते 80 लाख रुपये कमवत असल्याचं बोललं जातं. या हिशेबानं त्याचं मासिक उत्पन्न 3.6 कोटी ते 6.4 कोटी रुपये एवढं होतं.

कपीलला मिळत असलेली ही रक्कम आलिया भट, टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर यांना मिळत असलेल्या रकमेपेक्षा जास्त आहे. आलिया 4-5 कोटी रुपये, टायगर श्रॉफ आणि आदित्य रॉय कपूर जवळपास 6 कोटी रुपये आणि श्रद्धा कपूर 3-3.5 कोटी रुपये कमवत असल्याच्या चर्चा आहेत.