सलमाननं अखेर म्हटलंच... 'आय लव्ह यू टू'

अभिनेता सलमान खान याचा 'बजरंगी भाईजान' हा सिनेमा पाहिल्यानंतर हमसून हमसून रडणाऱ्या चिमुरड्या 'सुझी'ला सलमाननं एक गोड मॅसेज दिलाय. 

Updated: Jul 25, 2015, 04:00 PM IST
सलमाननं अखेर म्हटलंच... 'आय लव्ह यू टू' title=

मुंबई : अभिनेता सलमान खान याचा 'बजरंगी भाईजान' हा सिनेमा पाहिल्यानंतर हमसून हमसून रडणाऱ्या चिमुरड्या 'सुझी'ला सलमाननं एक गोड मॅसेज दिलाय. 

काही दिवसांपासून सिनेमा पाहिल्यानंतर आईच्या कुशीत रडणाऱ्या सुझीचा व्हिडिओ सोशल वेबसाईटवर हिट झाला होता.

'आय लव्ह सलमान' असं रडत रडत म्हणणाऱ्या चिमुकल्या सुझीचा हा व्हिडिओ काही दिवसांनी का होईना पण अखेर सलमान खानपर्यंत पोहचलाच. त्यानंही मग वेळ न दवडता सुझीसाठी एक गोड मॅसेज लिहिला. 'आय लव्ह यू टू' असा मॅसेज ट्विटरवर लिहिलाय. 

सुझीचा हा रडतानाचा व्हिडिओ सिनेमाचा दिग्दर्शक कबीर खान यानं गेल्या आठवड्यात शेअर केला होता. 

'बजरंगी भाईजान' या सिनेमात सलमानसोबतच 6 वर्षांच्या हर्षाली मल्होत्रा हिचीही मुख्य भूमिका आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.