मला सलमानसोबत रोमान्स करायचाय : डेझी शाह

बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या प्रसिद्ध 'मैने प्यार किया' हा चित्रपटात मुख्य अभिनेत्रीची भूमिका बजावण्याची अभिनेत्री डेझी शाहची इच्छा आहे. तसेच तिला संजय लीला भन्साळी आणि विशाल भारद्वाज यांच्यासोबतही काम करायचेय. 'मैने प्यार किया'मधील भाग्यश्री यांची भूमिका करणे आणि सलमानसोबत रोमान्स करण्याची इच्छा आहे, असे डेझी शाहने सांगितले. 

Updated: Nov 30, 2015, 12:35 PM IST
मला सलमानसोबत रोमान्स करायचाय : डेझी शाह title=

मुंबई : बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या प्रसिद्ध 'मैने प्यार किया' हा चित्रपटात मुख्य अभिनेत्रीची भूमिका करण्याची इच्छा अभिनेत्री डेझी शाहने व्यक्त केलीय. तसेच तिला संजय लीला भन्साळी आणि विशाल भारद्वाज यांच्यासोबतही काम करायचेय. 'मैने प्यार किया'मधील भाग्यश्री यांची भूमिका करणे आणि सलमानसोबत रोमान्स करण्याची इच्छा आहे, असे डेझी शाहने सांगितलेय. 

डेझी शाहने गेल्यावर्षी सलमानच्या 'जय हो' या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. अभिनेत्री होण्याआधी डेझी कोरिओग्राफर होती. 

तीन वर्षांपूर्वीच कोरिओग्राफी सोडली. आता मला पूर्णपणे अभिनयावर लक्ष केंद्रित करायचेय. याचा मी आनंद घेत आहे. मला वेगवेगळे चित्रपट करायचे आहेत असे डेझी यावेळी म्हणाली. डेझीचा आगामी 'हेट स्टोरी ३' चार डिसेंबरला प्रदर्शित होतोय. डेझीव्यतिरिक्त या चित्रपटात जरीन खान, शर्मन जोशी आणि करण सिंग ग्रोवर यांच्या भूमिका आहेत.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.