'AIB'वर करण जोहरचं उत्तर, 'आपल्या लायकीचं नसेल तर पाहू नका'

सेंसर बोर्डचे सदस्य आणि निर्माते अशोक पंडित यांनी निर्माता करण जोहरच्या शिविगाळवाल्या कॉमेडी शो 'एआयबी रोस्ट' बद्दल अपमानकारक वक्तव्य केल्यानंतर नवा वाद सुरू झालाय. महाराष्ट्र सरकार पण या शोची चौकशी करणार आहे.

Updated: Feb 4, 2015, 01:30 PM IST
'AIB'वर करण जोहरचं उत्तर, 'आपल्या लायकीचं नसेल तर पाहू नका' title=

मुंबई: सेंसर बोर्डचे सदस्य आणि निर्माते अशोक पंडित यांनी निर्माता करण जोहरच्या शिविगाळवाल्या कॉमेडी शो 'एआयबी रोस्ट' बद्दल अपमानकारक वक्तव्य केल्यानंतर नवा वाद सुरू झालाय. महाराष्ट्र सरकार पण या शोची चौकशी करणार आहे.

राज्य सरकारनं शोची चौकशी करण्याची घोषणा केली होती आणि सांगितलं, की एआयबीच्या या शोनं योग्य त्या परवानग्या घेतल्या होत्या की नाही, याची चौकशी करणार आहेत. शोमध्ये अभिनेता अर्जुन कपूर आणि रणवीर सिंह यांनी अश्लिल वक्तव्य केलेत. भारतातील असा हा पहिलाच शो आहे.

 

नुकतेच सेंसर बोर्डाचे सदस्य झालेले पंडित यांनी कॉमेडी शोला व्यासपीठावर अश्लिल शोचं प्रदर्शन असं म्हणत करण जोहरला सुनावलं होतं. यावर आता करण जोहरचं उत्तर आलंय. करण जोहरनं ट्विट करून लिहिलंय, 'जर आपल्याला वाटतं की, हे आपल्या लायकीचं नाहीय तर पाहू नका', 'वी स्टँड बाय एआयबी नॉकआऊट'च्या ट्विटर ट्रेंडसह अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानंही पंडित यांच्यावर टीका केलीय.

 

मुंबईमध्ये हा शो झाला होता. यात जवळपास ४ हजार लोकं सहभागी झाले होते. प्रेक्षकांमध्ये करण जोहरची आई, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, आलिया भट्ट आणि दीपिका पदुकोण सह इतर लोक उपस्थित होते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.