'हैदर'मध्ये तब्बूचा निकाह लावणाऱ्या इमामाला पदच्यूत केलं

विशाल भारद्वाजच्या 'हैदर' या सिनेमात एक छोटी भूमिका निभावण्यासाठी एका इमामाला मोठी किंमत मोजावी लागलीय. या इमामाला नोकरीतून बरखास्त करण्यात आलंय. 

Updated: Jan 29, 2015, 03:27 PM IST
'हैदर'मध्ये तब्बूचा निकाह लावणाऱ्या इमामाला पदच्यूत केलं title=

श्रीनगर : विशाल भारद्वाजच्या 'हैदर' या सिनेमात एक छोटी भूमिका निभावण्यासाठी एका इमामाला मोठी किंमत मोजावी लागलीय. या इमामाला नोकरीतून बरखास्त करण्यात आलंय. 

'हैदर' या सिनेमात इमाम गुलाम हसन शाह यांनी गजला मीर (तब्बू) हिचा निकाह लावला होता. 

श्रीनगरच्या मस्जिद - ए - बाबा दाऊद खाकी व्यवस्थापनानं इमाम गुलाम हसन शाह यांना मस्जिदच्या सेवेतून बरखास्त केलंय. व्यवस्थापनाच्या म्हणण्यानुसार, इमाम गुलाम यांनी सिनेमात अनैतिक कार्याला प्रोत्साहन दिलंय. 'हैदर' या सिनेमात इमाम गुलाम यांनी काम केलंय हे समजल्यानंतर व्यवस्थापनानं त्यांना अनैतिक कार्य केल्याचा ठपका ठेवत आपल्या पदावरून बरखास्त केलंय. 

इमाम गुलाम यांनी आपले वकील फिरदौस अहमद भट यांच्याकडून 'हैदर' सिनेमाचा दिग्दर्शक विशाल भारद्वाज याला कायदेशीर नोटीस बजावलीय. विशालनं आपली माफी मागावी किंवा मानहानी करण्यासाठी 50 लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, असं यामध्ये म्हटलं गेलंय. 

पण, इमाम गुलाम यांच्या म्हणण्यानुसार, हैदरचा दिग्दर्शक विशाल भारद्वाज याला शूटींगची परवानगी केवळ शिक्षणाच्या कारणास्तव देण्यात आली होती. 'हैदर'मुळेच आपली नोकरी गेली तसंच आपल्याला दिलेला शब्दही विशालनं पाळला नाही, असा आरोप इमाम गुलाम  हसन यांनी केलाय. 

इमाम गुलाम हसन शाह मस्जिदे-बाबा दाऊद खाकी मस्जिदमध्ये गेल्या सात वर्षांपासून इमामांचं काम करत होते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.