इमरान हाश्मीच्या फॅनची 'अशीही' एक मागणी!

बॉलीवूडचा 'सिरियल किसर' म्हणून ओळखला जाणारा इमरान हाश्मी सध्या त्याची हीच इमेज बदलण्याच्या प्रयत्नात आहे.  इतर काही कलाकारदेखील 'याबाबतीत' त्याला टक्कर देऊन त्याच्या प्रयत्नात मदत करत आहेत. 

Updated: Dec 16, 2014, 10:24 AM IST
इमरान हाश्मीच्या फॅनची 'अशीही' एक मागणी! title=

मुंबई : बॉलीवूडचा 'सिरियल किसर' म्हणून ओळखला जाणारा इमरान हाश्मी सध्या त्याची हीच इमेज बदलण्याच्या प्रयत्नात आहे.  इतर काही कलाकारदेखील 'याबाबतीत' त्याला टक्कर देऊन त्याच्या प्रयत्नात मदत करत आहेत. 

परंतु, इमरान हाश्मीचे फॅन्सना मात्र इमरान एवढ्यासाठीच लक्षात आहे, असं दिसतंय... त्यांना आवडते ती फक्त आणि फक्त इमारनची किस... आणि त्याचा सिरियल किसरचा रोल...

सध्या इमरान केप टाऊनमध्ये त्याचा आगामी सिनेमा 'हमारी अधुरी कहानी'च्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमाचं शुटींग सुरू असताना इमरानची एक महिला फॅन इथं दाखल झाली... आणि तिने इमरानकडे चक्क एका 'किस'ची मागणी केली.

यावर, इमरान थोडा अवघडला... नंतर मात्र त्यालाच खूप हसू आलं आणि थोड्या वेळानं आपल्या फॅनला 'किस' न देताच तो तेथून निघून गेला. परंतु, यामुळे त्याची महिला फॅन मात्र चांगलीच हिरमुसली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.