ऋतिक 20 फूट लांब मगरीसोबत लढणार!

आपल्या परफॉर्मन्ससाठी वाट्टेल तेवढी मेहनत घ्यायल अभिनेता ऋतिक रोशन नेहमीच तयार असतो... आपली भूमिकेला न्याय देण्यासाठी त्यानं आजवर अनेक प्रयोगही करून पाहिलेत. आता तर त्यानं आपला जीवही धोक्यात टाकण्याचा निर्णय घेतलाय. 

Updated: Sep 22, 2015, 03:59 PM IST
ऋतिक 20 फूट लांब मगरीसोबत लढणार! title=

मुंबई : आपल्या परफॉर्मन्ससाठी वाट्टेल तेवढी मेहनत घ्यायल अभिनेता ऋतिक रोशन नेहमीच तयार असतो... आपली भूमिकेला न्याय देण्यासाठी त्यानं आजवर अनेक प्रयोगही करून पाहिलेत. आता तर त्यानं आपला जीवही धोक्यात टाकण्याचा निर्णय घेतलाय. 

अधिक वाचा - नरेंद्र मोदींनी बालपणी घरी आणली होती जिवंत मगर

मिळालेल्या माहितीनुसार, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर याच्या आगामी 'मोहन्जोदडो' या सिनेमासाठी ऋतिकनं आपला जीवही पणाला लावलाय. या सिनेमात एका सीनच्या शूटींगसाठी ऋतिक चक्क एका 20 फूट लांब मगरीशी फायटींग करताना दिसणार आहे, असं समजतंय.

अर्थातच, या सीनसाठी काही स्पेशल इफेक्टसही वापरले जाणार आहेत. याअगोदर आशुतोषच्याच 'जोधा अकबर' या सिनेमात ऋतिक एका हत्तीसोबत फायटींग करताना दिसला होता. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.