ऐश्वर्याचं कमबॅक आणि नवा सहकारी

बऱ्याच दिवसानंतर ऐश्वर्या राय बच्चनला एक अनोखा साथीदार मिळाला आहे. संजय गुप्ताचा आगामी सिनेमा जज्बाच्या निमित्ताने ऐश्वर्या पुन्हा कमबॅक करतेय. या चित्रपटाचा अभिनेता असेल इरफान खान.

Updated: Aug 28, 2014, 03:35 PM IST
ऐश्वर्याचं कमबॅक आणि नवा सहकारी

मुंबई : बऱ्याच दिवसानंतर ऐश्वर्या राय बच्चनला एक अनोखा साथीदार मिळाला आहे. संजय गुप्ताचा आगामी सिनेमा जज्बाच्या निमित्ताने ऐश्वर्या पुन्हा कमबॅक करतेय. या चित्रपटाचा अभिनेता असेल इरफान खान.

ऐश्वर्या चित्रपटात एका वकीलाची भूमिका पार पाडणार आहे, तर इऱफान एक निलंबित पोलिस अधिकाऱ्यांची भूमिका पार पडणार आहे. ज्याचा लढा सिस्टीम सोबत आहे.

या चित्रपटाचं शुटिंग लवकरच सुरू होईल, या चित्रपटासाठी ऐश्वर्याने मोठ्या प्रमाणात वजन कमी केलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.